नगर: पालिकांची अंतिम प्रभागरचना मंगळवारी | पुढारी

नगर: पालिकांची अंतिम प्रभागरचना मंगळवारी

नगर: पुढारी वृत्तसेवा

कोपरगाव, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव, जामखेड या नगरपालिका व नेवासा नगरपंचायतींच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरु आहे. या नगरपालिकांची अंतिम प्रभागरचना मंगळवारी प्रसिध्द होणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यांत निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्याची शक्यता आहे.

पावसाचा नेमका अंदाज वर्तवणारे काय आहेत पूर्वसंकेत

कोपरगाव, संगमनेर, राहुरी, राहाता, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर व पाथर्डी या नगरपालिकांची मुदत डिसेंबर महिन्यात संपली आहे. शेवगाव व जामखेड नगरपालिकांची मुदत संपून एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. कोरोनामुळे या निवडणुकांना शासनाने स्थगिती दिली होती.

इस्लामपूर : ‘कृष्णा’तर्फे मोफत घरपोच साखर

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ घ्या, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे आयोगाने नऊ नगरपालिका व एक नगरपंचायतीच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 10 मे ते 14 मे 2022 या कालावधीत प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागविल्या होत्या. 74 प्राप्त हरकतींवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सुनावणी घेतली.

ऐतवडे बुद्रुक : पक्ष्यांच्या हालचालींवरून पावसाचा अंदाज

जिल्हाधिकारी भोसले यांनी कोपरगाव, संगमनेर व श्रीरामपूर या तीन ब वर्ग नगरपालिकांच्या हरकती व सूचनांवर अभिप्राय देऊन, अंतिम प्रभागरचनेस मान्यता देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविला आहे.

संकेतस्थळावर होणार प्रसिध्द

सर्व नगरपालिकांचा अहवाल नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या सर्व नगरपालिकांच्या प्रभागरचनेस सोमवारपर्यत मान्यता मिळणार आहे. मान्यता मिळाल्यानंतर 7 जून 2022 रोजी अंतिम प्रभागरचना नगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार आहे.

Back to top button