संगमनेरात सापळा रचून पकडले 400 किलो गोमांस | पुढारी

संगमनेरात सापळा रचून पकडले 400 किलो गोमांस

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा

संगमनेरच्या उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या पथकाने सायखिंडी फाट्यावर सापळा लावून एका कारमधून मुंबईच्या दिशेने निघालेले 400 किलो गोवंशाचे मांस पकडले असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनचालकासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली. मात्र, मुख्य संशयित पसार झाला आहे.
याबाबत उपविभागीय पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय याकडून समजलेली अधिक माहिती अशी की, रविवारी (ता.15) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर एका आलिशान वाहनामध्ये गोमांस जात असल्याची गुप्त माहिती खबर्‍या मार्फत उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांना समजली होती.
त्यानुसार त्यांनी आपल्या पथकातील पो. ना. अण्णासाहेब दातीर, पो. कॉ. अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे यांच्या पथकास एक वाहन संगमनेरकडून नाशिकच्या दिशेने येत असल्याचे दिसले. पथकाने ‘त्या’ संशयित कारचालकास थांबण्याचा इशारा केला, त्याने आपले वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केले.
पोलिस पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात पाठीमागील बाजूस काळ्या रंगाच्या प्लास्टिक कागदात गुंडाळालेले सुमारे चारशे किलो वजनाचे गोवंशाचे मांस आढळून आले. यानंतर पोलिस पथकाने दोघांनाही ताब्यात घेत वाहनासह शहर पोलिस ठाण्यात आणले.
तेथे त्यांची चौकशी केली असता त्या वाहनचालकाने आपले नाव साद खालीद शेख (वय 19, रा. भारतनगर) व त्याच्या साथीदाराचे नाव ऋषिकेश मच्छिंद्र भोसले रा. मोगलपुरा) असे असल्याचे सांगितले.  गोवंशाचे मांस कोणाच्या मालकीचे आहे, याबाबत विचारणा करता त्यांनी मदिनानगर येथील अजमद लतिफ कुरेशी यांच्या मालकीचे असून त्याच्याच सांगण्यावरून मांस वाहनात भरल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा : 

Back to top button