नगर ः पुढारी वृत्तसेवा
संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांची सोमवारी(दि.12) नगर शहरात आली होती. या शांतता रॅलीमध्ये गर्दीचा फायदा घेऊन अनेकांचे मोबाईल व खिसे रिकामे झाले. त्या खिसेकापू चोरांवर कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई करीत 14 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सचिन विष्णू खामकर (वय 38, रा. प्रेमदान हडको, नगर), अर्जुन तुळशिराम जाधव (वय 20, रा. सुपा, ता. पारनेर), आण्णा बाळू पवार (वय 51), श्यामराव रामा गायकवाड (वय 22), मच्छिंद्र दशरथ गायकवाड (वय 26), बबलू रोहिदास साठे (वय 25), शीतल रावसाहेब काळे (वय 24), विकास रमेश गायकवाड (वय 20), विजय अशोक माने (वय 22), आजिनाथ आण्णा गायकवाड (वय 60), नागू आण्णा गायकवाड (वय 54, सर्व रा. मिलिंद नगर, जामखेड), राहुल शरद पवार (वय 20, रा. नान्नज जवळा, ता. जामखेड), सागर बाळू रिटे (वय 25, रा. कुंभार तळ गोरोबा पिक्चर टॉकेजसमोर, ता. जामखेड), एका एक अल्पवयीन मुलाचा आरोपीमध्ये समावेश आहे.
12 ऑगस्ट 2024 रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या नगरमध्ये आयोजित केलेल्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली व जनसंवाद सभेत घुसून खिसे कापू चोरांनी हातसफाई केल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती.
चोरांची टोळी नगर व जामखेडची असल्याची माहिती समजली. ही टोळी मोटारकार व दुचाकीवर शहरात आले. रॅलीत सहभागी झालेवर ठिकठिकाणी लोकांच्या गर्दीत घुसून हातसफाई केली. अशा 14 चोरट्यांना कोतवाली गुन्हे शोध पथकाने रॅली व सभेतून ताब्यात घेतले. त्यामुळे अनेक घटना होण्याअधीच टळल्या. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली रक्कम व एक मोटारकार, दोन दुचाकी असा सहा लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अमोल दिलीप गाढे यांनी फिर्याद दिली.