नगर : मढीत स्वच्छतागृहासाठी 10 लाख : आमदार दरेकर

नगर : मढीत स्वच्छतागृहासाठी 10 लाख : आमदार दरेकर
Published on
Updated on

मढी : पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र मढी येथे राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. पंढरपूरच्या धर्तीवर मढी देवस्थानकडून उभारण्यात येणार्‍या स्वच्छतागृहासाठी आमदार निधीतून दहा लाख रूपयांचा निधी देणार असल्याचे भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी जाहीर केले. पाथर्डीतील कार्यक्रमाला जाताना दरेकर यांनी मढी देवस्थानला भेट देऊन चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन महापूजा केली. यावेळी आमदार मोनिका राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, देवस्थान समितीचे अध्यक्ष बबन मरकड, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे शामराव मरकड, नवनाथ मरकड, ग्रामपंचायत सदस्य चंद्रभान पाखरे, गणेश मरकड आदी उपस्थित होते. आमदार मोनिका राजळे यांनी देवस्थानचा इतिहास, नाथ संप्रदायाची परंपरा, अठरापगड जातींचे कुलदैवत असलेली स्थाने आदींबाबत त्यांना माहिती दिली.

दरेकर म्हणाले, राज्यातील प्राचिन व ऐतिहासिक देवस्थानांच्या सर्वांगीण विकासाकडे शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. धर्मस्थळे हीच राज्याची शक्तीस्थळे व प्रेरणास्थळे व्हावीत, यासाठी वेगवेगळे उपक्रम शासनाने हाती घेतले आहेत. यात्रेसाठी लाखो भाविक मढी येथे येतात. देवस्थान समितीकडून मूलभूत सुविधा पुरविल्या जातात. यात आणखी वाढ होऊन वाढीव स्वच्छतागृहाची तातडीची गरज पाहता दहा लाख रुपये आपल्या निधीतून उपलब्ध करून देऊ. मढी- मायंबा रोप-वेसाठी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आवश्यक एवढा निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करू. मढी देवस्थानच्या अन्नछत्रालयाची पाहणी करून देवस्थान समितीच्या नियोजनाचे दरेकर यांनी कौतुक केले. देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड यांनी स्वागत केले. नवनाथ मरकड यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news