Amol Mitkari |”दादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली”; मिटकरींची कदमांवर टीका

Amol Mitkari
Amol Mitkari

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी रामदास कदम यांनी 'अजित दादा आणखी थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते' असे म्हणत महायुतीच्या लोकसभेतील जागांवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार यांच्या गटात नाराजी पसरली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी रामदास कदम (Amol Mitkari) यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात एकनाथ शिदेंच्या गटातील नेते रामदास कदम यांनी जोरदार फटकेबाजी केली. रामदास कदम यांनी पवार यांच्यामुळेच महायुतीला लोकसभेत महराष्ट्रात कमी जागा मिळाल्याचा सूर व्यक्त केला. त्यांच्या 'या' विधानामुळे महायुतीत ठिणगी पडली असून, अजित पवार गटाच्या नेत्यांनी कदम या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Amol Mitkari: …तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं

अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, रामदास कदमजी तुम्ही जोरातच बोललात, "मागून आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं". परंतु ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. जर त्यांना यायला उशीर झाला असता तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं. अजित दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका, अशी कानउघडणीदेखील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news