Sanjay Raut| ….तर अध्यक्षपदासाठी चंद्राबाबूंना आघाडी पाठींबा देईल; खासदार संजय राऊत

संजय राऊत
संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क: युती सरकारमधील तेलगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपद मागितले आहे. दरम्यान "चंद्राबाबू नायडूंना हे पद मिळाले नाही तर त्यांच्या उमेदवाराला 'इंडिया' आघाडी पाठिंबा मिळेल याची आम्ही खात्री करू…"असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (दि.१६ जून) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

आम्ही ऐकले आहे की चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपद मागितले आहे. जर एनडीएच्या उमेदवाराला लोकसभा अध्यक्षपद मिळाले नाही, तर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चंद्राबाबू नायडूंचा तेलगू देलम पक्ष, नितीशकुमारांचा जनता दल (युनायटेड), आणि रामलाल पासवान यांचा लोक जनशक्ति पक्ष फोडतील, असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

"लोकसभा अध्यक्षांची ही लढत महत्त्वाची आहे. यावेळी 2014 आणि 2019 सारखी परिस्थिती नाही. सरकार स्थिर नाही. लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना मिळावं", असेही मत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news