Sahitya Akademi Award 2024 | भारत सासणे, देविदास साैदागर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Sahitya Akademi Award
Sahitya Akademi Award
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या 'समशेर आणि भूतबंगला' या कादंबरीला यंदाचा बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर तुळजापूर येथील देविदास सौदागार यांच्या 'उसवण' या कादंबरीला साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी आज शनिवारी (दि.१५ जून) विविध भाषांतील बालसाहित्य तसेच युवा पुरस्कारांची घोषणा केली. (Sahitya Akademi Award 2024)

यंदा जाहीर झालेल्या साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये असामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्ऩड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, राजस्थानी, संताली, सिंधी, तमिळ, तेलगू आणि उर्दू भाषेतील लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे. संसकृत भाषेतील पुरस्कारांची घोषणा नंतर केली जाणार आहे, असेही अकादमीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.

सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. शरणकुमार लिंबाळे, किरण गुरव आणि श्रीकांत उम्रीकर यांच्या परीक्षक समितीने मराठी भाषेतील युवा पुरस्काराच्या साहित्यकृतीची निवड केली आहे. तर ज्येष्ठ बाल साहित्यिक राजीव तांबे, हिंदी, मराठी लेखक आणि अनुवादक विजय प्रभाकर नागरकर आणि मराठी लेखक विनोद शिरसाठ यांनी  बालसाहित्याची निवड केली.

युवा साहित्य पुरस्कारांमध्ये 23 भाषेतील युवा साहित्यिकांना अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आले. तर, बाल साहित्य पुरस्कारांसाठी 24 भाषेतील साहित्यकांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेली आहे. युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे.

देविदास सौदागर महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित युवा लेखक

मराठी भाषेसाठी देविदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीस साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला. श्री देविदास सौदागर हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित युवा लेखक आहेत. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे मराठी साहित्य विश्वात एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण आणि शहरी जीवनातील विसंगती, संघर्ष आणि मानवी भावभावना या त्यांच्या लेखनातील मुख्य विषयांपैकी एक आहेत. 'उसवण' ही त्यांच्या साहित्यिक प्रवासातील एक महत्वपूर्ण कामगिरी मानली जाते. त्यांच्या लेखनात मानवी नात्यांची गुंतागुंत आणि समाजातील विविध प्रश्नांची चर्चा प्रकर्षाने आढळते.

'उसवण' ही कादंबरी वाचकांमध्ये विशेष लोकप्रिय

'उसवण' ही कादंबरी एका ग्रामीण समाजातील कथा सांगते ज्यात कुटुंबातील नातेसंबंध, सांस्कृतिक बदल आणि सामाजिक ताणतणाव यांचे सूक्ष्म चित्रण आहे. या कादंबरीत ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनाचे बारकावे, आर्थिक संकटे आणि आधुनिकतेचे वाढते दबाव या सर्वांचे वर्णन आहे. कादंबरीतील पात्रांची विश्वसनीयता आणि कथानकाची गुंफण वाचकांना तल्लीन करते. देविदास सौदागर यांच्या शैलीत कथानकाचे नाट्यमय आणि संवेदनशील चित्रण आढळते, ज्यामुळे 'उसवण' ही कादंबरी वाचकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे.

भारत जगन्नाथ सासणे मराठी साहित्य विश्वातील प्रतिष्ठित कथाकार

सुप्रसिद्ध बाल साहत्यिकार भारत सासणे यांच्या ' समशेर आणि भुतबंगला' या मराठी कादंबरीला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहिर झाला. भारत जगन्नाथ सासणे हे मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिष्ठित कथाकार आहेत. त्यांचा जन्म २७ मार्च १९५१ रोजी जालना येथे झाला. साहित्य क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कथा, लेखनशैली आणि कथावस्तूंमध्ये ग्रामीण जीवनाचे विविध पैलू, सामाजिक समस्या आणि मानवी भावनांचे सूक्ष्म दर्शन घडते. त्यांच्या लेखनाची शैली वाचकांना विचारप्रवृत्त करते आणि त्यांच्या कथा मराठी साहित्य विश्वात एक विशिष्ट ठसा उमटवतात.

मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्यिाक श्री किरण गुरव डॉ. शरणकुमार लिंबाळे व श्री श्रीकांत उमरीकर यांचा समावेश होता. मराठी भाषेसाठी तीन सदस्य निर्णयाक मंडळामध्ये राजू तांबे, विजय नगरकर आणि विनोद शिरसाठ या साहित्यिषकांचा समावेश होता. संस्कृतमधील युवा पुरस्कार विजेत्याची घोषणा नंतरच्या तारखेला केली जाईल, असे अकादमीने एका निवेदनात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news