आष्टी येथे तलावानजीक आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

आष्टी येथे तलावानजीक आढळला अर्धवट जळालेला मृतदेह
आष्टी येथे तलावानजीक आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: अमरावती-आष्टी मार्गावर एका शिवारातील कोरड्या तलावामध्ये 25 ते 30 वर्षे वयोगटातील अज्ञात युवकाचा अर्धवट जळालेला मृतदेह गुरुवारी (दि.13) आढळून आला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात युवकाची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, असा तर्क व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

दुपारच्या सुमारास एका मजुराला हा मृतदेह कोरड्या पानवठाच्या जागेवर आढळून आला. यानंतर त्याने याची माहिती पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी वलगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शहर पोलीस आयुक्तालयातील डीसीपी गणेश शिंदे आणि सागर पाटील, गुन्हे शाखेचे प्रमुख गोरखनाथ जाधव, फॉरेन्सिक एक्सपर्ट हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.

घटनास्थळी सापडले पेट्रोलचे कॅन आणि माचिस

घटनास्थळी तपासनी करत असताना पोलिसांना पेट्रोलचे कॅन आणि माचिस आढळून आली आहे. यासह पोलिसांच्या माहितीनुसार, मृत युवकाच्या मानेवर आणि पायावर जखमा आहेत. त्यामुळे युवकाला आधी धारदार शास्त्राने जखमी करून मारण्यात आले. नंतर त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news