बीड: पोलीस ठाण्यातून पळालेला तरुण पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

बीड: पोलीस ठाण्यातून पळालेला तरुण पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

[author title="गौतम बचुटे" image="http://"][/author]

केज : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा आरोपी केज पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. त्याला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले असून पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्या प्रकरणी त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. १०) केज पोलिसांनी अमोल शेप याला त्याने सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून न घडलेल्या घटने संदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यामुळे सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊन दोन समाजात तेढ निर्माण होण्याच्या शक्यतेने केज पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले होते.

त्याला ताब्यात घेऊन त्याला रीतसर अटक करण्यात आली असल्याने अमोल शेप याला लॉक अप गार्डवर असलेले हवालदार गोरख फड यांच्या ताब्यात देण्यात आले होते. तो पोलिसंच्या ताब्यात असल्याची कल्पना त्याला देण्यात आलेली होती. त्याला पोलीस नाईक गोरख फड यांच्याजवळ बसविले होते. तसेच पोलिसांच्या परवानगी शिवाय त्याने कुठेच जाऊ नये. असे सांगितले होते.

मात्र, सकाळी ११. ४५ च्या सुमारास तक्रारदारांची पोलीस स्टेशनमध्ये गर्दी असल्याने अमोल शेप हा गर्दीचा फायदा घेऊन केज पोलीस स्टेशन येथून पळून गेला. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशाने अमोल याचा पोलिसांनी शोध घेवून त्याला केज येथील बस स्टँड मधून ताब्यात घेतले.

पुढील तपास पोलीस जमादार त्रिंबक सोपने करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news