नाशिक: पाण्यासाठी देवळ्यात उपोषण; पंचक्राेशीतील ग्रामस्थांचाही पाठींबा

देवळा : झाडी धरणात चणकापूर वाढीव उजव्या कालव्याद्वारे पूरपाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी सांगवी येथे उपोषणाला बसलेले हरीसिंग ठोके, संजय दहिवडकर, सतीश ठाकरे आदी (छाया ; सोमनाथ जगताप)
देवळा : झाडी धरणात चणकापूर वाढीव उजव्या कालव्याद्वारे पूरपाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी सांगवी येथे उपोषणाला बसलेले हरीसिंग ठोके, संजय दहिवडकर, सतीश ठाकरे आदी (छाया ; सोमनाथ जगताप)

देवळा (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा –  तालुक्यातील पूर्वभागातील ग्रामस्थांना रामेश्वरपासून पुढे झाडी वाढीव उजव्या कालव्याद्वारे पुरपाणी सोडण्यात यावे, अशा मागणीसाठी बुधवार (दि.12) रोजी सांगवी ता. देवळा येथे हरीसिंग ठोके यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. तर त्यांच्या उपोषणाला पाठींबा मिळावा यासाठी मेशी, दहिवड पंचक्रोषीतील ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे.

देवळा तालुक्यातील पूर्व भागात यंदा भीषण पाणीटंचाई जाणवत असून पावसाळा सुरु झाला तरी ग्रामस्थांच्या डोक्यावर जलसंकटाची तलवार आहे. येथील सर्वच दुष्काळग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. चणकाकापूर उजवा कालवा पुढे रामेश्वर पासून वाढीव झाडी एरंडगाव उजव्या कालव्या पासून लाभक्षेत्रातील शेतकरी पाणीपुरवठा पासून वंचित आहेत. त्यांना न्याय मिळावा यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले जात असून , प्रशासनाने याची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

प्रामुख्याने झाडी धरणात यावर्षी पूर पाणी सोडण्यात यावे, चणकापूर ते झाडी एक्स्प्रेस कालव्याला मान्यता आहे तर तो त्या पद्धतीने तयार करण्यात यावा. चणकापूर ते झाडी कालव्याची रुंदीकरण व अस्तीकरण करून वहन क्षमता वाढविण्यात यावी. चणकापूर ते झाडी हा रामेश्वर धरणातून बायपास करून पूर्ण कालवा झाडीपर्यंत एक्सप्रेस करण्यात यावा अशा मागण्या यावेळी मांढण्यात आल्या आहेत. उपोषणाप्रसंगी प्रहारचे मालेगाव तालुका अध्यक्ष नंदू शेवाळे, शेखर पगार, दहिवड येथील संजय देवरे, कुंभार्डे येथील सतिष ठाकरे, मेशी येथील केदा शिरसाठ आदी लाभक्षेत्रातील ग्रामस्थांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठींबा दर्शविला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news