Monsoon Update | ब्रेकिंग: अखेर मान्सून मुंबईत दाखल

Monsoon Update | ब्रेकिंग: अखेर मान्सून मुंबईत दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क: मान्सून आज (दि.९ जून) राजधानी मुंबईत दाखल झाला आहे. नियोजित वेळेच्या आधीच २ दिवस मान्सून (Monsoon Update) मुंबईत दाखल झाला आहे. या संदर्भातील माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

नैऋत्य मान्सून ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. गुरूवारी ६ जून रोजी महाराष्ट्रातील दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर तळकोकण ओलांडून मान्सूनची वाटचाल पुढे वेगाने सुरू आहे. त्यानंतर रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे ही शहरे काबीज करून मान्सून अखेर मुंबईमध्ये (Monsoon Update) आज (दि.९) दुपारी दाखल झाला आहे.

राज्यातील 'या' भागात अतिमुसळधार

आज ९ आणि १० जून रोजी दक्षिण कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टी आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे देखील भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news