Heavy rain forecast| मंगळवारपर्यंत राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: नैऋत्य मान्सून गुरुवारी ६ जून रोजी राज्यात दाखल झाला. मान्सूनची वाटचाल पुढे सुरूच आहे. दरम्यान राज्यातील मान्सूनच्या प्रभावाखाली आलेल्या भागांत वरूणराजाने हजेरी लावली आहे. तर उद्यापासून (दि.९ जून) मंगळवारपर्यंत (दि.११ जून) राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy rain forecast) पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवला आहे.

पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ.के.एस.होसाळीकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रविवार ९ जून ते मंगळवार ११ जूनपर्यंत कोकणातील काही भागांत मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेत या कालावधीत रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणीही पावसाचा अंदाज (Heavy rain forecast) देण्यात आला आहे., अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

९ जून ते ११ जून दरम्यान या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'

भारतीय हवामान विभागाने काल दिलेल्या अपडेटनुसार, पुढील 3 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी केला होता. यामध्ये ९ जून ते ११ जून दरम्यान अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान खालील जिल्ह्यांमध्ये अति-मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • रविवार, 9 जून- कोल्हापूर, सिंधुदुर्ग
  • सोमवार, 10 जून- कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी
  • मंगळवार, 11 जून-कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news