Raigad Shiv Rajyabhishek | ‘गड किल्ल्यांसाठी 2 हजार कोटी शासनाने द्यावे, अन्यथा किल्ले रायगडवरून खाली उतरणार नाही’; छत्रपती संभाजी राजे !

Shivrajyabhishek Sohla raigad
Shivrajyabhishek Sohla raigad

[author title="नाते इलियास ढोकले" image="http://"][/author]
राज्य शासनाने विकास काम व इतर घटकासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करत आहेत. त्याच धर्तीवर राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी फक्त रायगडच नव्हे, तर राज्यातील गडकिल्लेसाठी महामंडळ स्थापन करून 2 हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा; अशी मागणी 350 व्या शिवराज्याभिषेक दिन वर्षाच्या पूर्ततेप्रसंगी किल्ले रायगड राजसदरे वरून केली. यावेळी शासनाने जर निधी दिला नाही, तर आपण शिव भक्तांसह दुर्गराज रायगडवरून खाली उतरणार नाही असा इशारा दिला आहे. (Shivrajyabhishek Sohla raigad)

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्यभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन व त्याच्या पायावर नतमस्तक होण्यासाठी छत्रपती संभाजी राजे, युवराज शहाजी राजे, श्रीमती संयोगीता राजे, आमदार रोहित पवार, मनोज जरांगे पाटील, अनिकेत तटकरे, आमदार मंगेश चव्हाण, खासदार ओमराजे निंबाळकर, संदीप खांडेकर आदी. मान्यवर उपस्थित होते, यासह राज्यभरातील शिवभक्त सह रंगरागिनी मोठ्या संख्येने गडावर उपस्थित होते.

यावेळी शिवभक्तांना मार्गदर्शन करताना छत्रपती संभाजी राजे यांनी शिवकाल जागा करत शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व आचार घेऊन जावे व ते अंमलात आणावे तेच स्वराज्य म्हणावे लागेल असे सांगितले. यावेळी आग्राहुन सुटकासह इतर बाबीचा विचार मंथन केले.

यावेळी बोलताना संभाजी राजे यांनी सांगितले की, आपण 2007 ला प्रथम किल्ले रायगड वरील राज्यभिषेकला उपस्थित लावली होती. त्यावेळी फक्त 10 ते 20 हजार शिवभक्त उपस्थित असत, असे सांगत गेल्या 17 वर्षात हा सोहळा लोकोत्सव झाला असून राज्य नाही तर देशभरातून लोक येत असल्याचे त्यांनी सांगितले.

2025 च्या राज्यभिषेकसाठी आपण राजदूतांना आणणार असल्याचे सांगितले. इंग्रज अधिकारी याचे वंशज सुद्धा गडावर आले होते, त्यावेळी सुद्धा त्यांना इतिहास सांगितला तेही या राज्याच्या शौर्य पुढे नतमस्तक झाले. हे कार्य छत्रपती शिवाजी यांनाही केलं असून, त्याचे विचार आपण अमलात आणले पाहिजे. असे सांगत छत्रपतींच्या काळातही अनेक मावळे आदिलशाहीसह इतर गटात जात होते असे सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणत्याही धर्माला विरोध केला नाही ,जातीपातीचे राजकारण केले नाही जे सोबत आले त्यांना सोबत घेतले असे सांगत राजनीती कशी असावी याचे दाखले दिले. शिवरायांचा किल्ले रायगड समजण्यासाठी गडावर चालत यावे , असे सांगत बुधवारी सायंकाळी किल्ले रायगड पायऱ्या मार्गाने 82 वर्षाची शिरूर येथील जेष्ठ नागरिक व्यक्ती चालत आले होते. त्यानी एका हातात भगवा व दुसऱ्या हातात भारताचा तिरंगा घेत हे छत्रपती यांचे स्वराज्य आहे असे सांगितले .

सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानुसार होणे गरजेचे आहे. परदेशात इतिहास नसला तरी इतिहास घडवतात. आपल्या देशात, राज्यात इतिहास आहे. तो जपणे गरजेचे आहे असे सांगत शासन प्रत्येक मतदार संघात लाखो करोडो रुपयांची विकास कामेसाठी निधी मंजूर करत आहे. मात्र गडकिल्ले कडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करत शासनाने गडकिल्ले ना पैसे द्यावे, महामंडळ करा, समिती नेमा आणि छत्रपती संभाजी राजे यांना समितीमध्ये घ्या अथवा घेऊ नका मात्र छत्रपती शिवाजी महाराजांसाठी फक्त 2 हजार कोटी द्यावे. ते देऊ शकत नसल्यास रायगड उतरणार नाही. येथेच सर्व शिवभक्तांना घेऊन बसेन, असा सज्जड इशारा छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारला दिला आहे. तसेच शिवभक्त यांना गड उतरताना शांतपणे उतरावे असे आवाहन केले. यावेळी समितीचे अध्यक्ष खांडेकर यांनी प्रास्तविकमध्ये राज्यभिषेक समितीच्या कामाचा आढावा घेतला.

गुरूवार दि.6 जून 2023 रोजी तारखेप्रमाणे साजरा होणाऱ्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठीचीही प्रशासकीय सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रशासनाकडून शिवभक्तांना दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केले जात आहे. लाखो शिवभक्त गडावर जमू लागले असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकाराने रायगड दुमदुमला आहे. त्यातच मर्दानी खेळाने डोळ्यांचे पारणे फिटले असल्याची भावना शिवभक्त व्यक्त करत आहेत.

हा 350 व्या शिवराज्याभिषेकाचा प्रारंभ होत असून, राज्य शासनाच्या वतीने किल्ले रायगडावर यंदा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने गडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गडाच्या पायथ्याशी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्किंग करता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे सुमारे 150 बसेस ठेवण्यात आल्या आहेत. गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.या मध्ये श्रीवर्धन अग्निशमन , महाड , महाड औद्योगिक वसाहत असं इतर अग्निशमन च्या गाड्या ठिकठिकाणी उभे करण्यात आल्या आहेत. गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे शिवभक्तांनी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्गेच गडावर मार्गस्त होत अनेक शिवभक्त पायी मार्गवरील लहान सहन दगड बाजूला करत मार्गिका साफ करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news