नागपूर,पुढारी वृत्तसेवा: रामटेक लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री सुनील केदार समर्थक काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार उर्फ बबलू बर्वे सातत्याने आघाडी टिकवून असल्याने शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे समर्थक चिंतेत आहेत. ऐनवेळी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाल्यानंतर त्यांच्या पतींना उमेदवारी मिळाली (Ramtek Lok Sabha) होती.
राज्याचे लक्ष वेधणारी ही लढत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने या मतदार संघात तळ ठोकून होते. माजी खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिवसेनेचे धनुष्य हाती देण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी देखील नागपूर जिल्ह्यातील हा मतदार संघ प्रतिष्ठेचा (Ramtek Lok Sabha) झाला आहे.