नाशिक : मतमोजणीपूर्वी कर्मचारी-उमेदवार प्रतिनिधी यांना दिली शपथ

मतमोजणीपूर्वी कर्मचारी-उमेदवार प्रतिनिधी यांना शपथ देण्यात आली.
मतमोजणीपूर्वी कर्मचारी-उमेदवार प्रतिनिधी यांना शपथ देण्यात आली.

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क वृत्तसेवा – देशात कोणाचे सरकार बनणार? याचा निर्णय अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज मंगळवार (दि.४) रोजी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरवात होत आहे.

तर सकाळीच दिंडोरीची स्ट्रॉंग रूम उघडून मतमोजणीला प्रारंभ झालेला आहे.

टपाली मतमोजणीला प्रारंभ
टपाली मतमोजणीला प्रारंभ
सिन्नर ची मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममधून बाहेर काढण्यात आलेली असून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे
सिन्नर ची मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममधून बाहेर काढण्यात आलेली असून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे

पाठोपाठ नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली व इगतपुरी मतदार संघातील मतदान यंत्रे मतमोजणीसाठी स्ट्रॉंग मधून बाहेर काढण्यात आलेली असून इकडे देखील बंदोबस्तात मतमोजणी शांततेत सुरु आहे.

मात्र नाशिकमध्ये चार  तर दिंडोरीत दोन ईव्हीएम यंत्रणेत बिघाड दिसून आल्याचे वृत्त मिळाल आहे.

तर नाशिक येथे गोपनीयतेच्या उद्देशाने मतमोजणीपूर्वी कर्मचारी-उमेदवार प्रतिनिधी यांना शपथ देण्यात आलेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news