जळगाव : चार जूनचा एक्झिट पोलचा मुहुर्त ठरणार निर्णायक

जळगाव :  चार जूनचा एक्झिट पोलचा मुहुर्त ठरणार निर्णायक

जळगाव – नरेंद्र पाटील
जळगाव जिल्ह्यात राजकारणाचे उलथापालथी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यामध्ये उद्या चार जूनला लोकसभेचा निकाल लागणार असल्याबरोबरच राजकीय वाटचालीचे नेतृत्वही याच दिवशी ठरणार आहे. याच दिवशी जळगाव जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पदावर कोण बसणार हे पण निश्चित होणार आहे. यासाठी रस्सीखेच सुरु असून त्याची दोन टोके एक जामनेर तर दुसरे पाळधी अशी आहे. यामध्ये मात्र जिल्ह्याचा विचार कोणीच करताना दिसून येत नाहीत. पोलिसांच्या खाकीचा जम संपुष्टात आलेला दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे वर्चस्व वाढलेले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात एका मागून एक खून दरोडे, चोऱ्या, अन्य घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने मे महिना हा अत्यंत उष्ण म्हणून ओळखला जात आहे. या महिन्यात जळगावचे तापमान उच्चांकापर्यंत गेलेले होते. 13 मे रोजी चौथ्या टप्प्याच्या रुपाने जळगाव लोकसभेतील रावेर व जळगाव लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली व उमेदवारांचे भविष्य हे ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे. उद्या ईव्हीएम मशीन उघडले जाणार असून राजकीय भूकंप, राजकीय गणिते व राजकीय वाटचाली या सर्व गोष्टी अवलंबून आहेत.

या सर्व लढत प्रमुख पक्षांमध्ये जरी असली तरी इतर पक्षांचे उमेदवारांमुळे मुख्य पक्षांच्या उमेदवारांना धोका निर्माण होऊ शकतो अशीही परिस्थिती काहीशी जळगाव व रावेर लोकसभेमध्ये होऊ शकते. त्यामुळे सर्वांच्या नजरा उद्याच्या निकालाकडे लागल्या आहेत. येत्या विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व व त्याची आखणी व उमेदवारांची बाजू या सर्व गोष्टी देखील यावर अवलंबून आहे. भाजपाच्या विद्यमान आमदार युतीचे विद्यमान आमदार यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये काय झेंडे रोवले आहेत याची गणिते या चार जूनच्या निकालावर सर्वस्वी अवलंबून राहणार आहे.

या निकालामध्ये महायुतीला जिल्ह्याने निवडले तर नेतृत्वाची धुरा भाजपाचे नामदार गिरीश महाजन यांच्याकडे राहील. शिंदे गटाचे गुलाबराव पाटील तर आहेत. त्यामध्ये अनिल भाईदास पाटील यांचाही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र चित्र बदलल्यास राजकीय समीकरणे बदलणार आहेत यात काहीच शंका नाही. त्यामुळे विधानसभा क्षेत्राचा सर्व बाजूंच्या कौल हा लोकसभेच्या निकालावर अवलंबून असल्याचे जाणवत आहे.

31 मे ला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हे सेवानिवृत्त झाले आहेत. आजपर्यंतच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या इतिहासामध्ये अधिकारी बदलल्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी अधिकारी येत असतो. मात्र प्रथमच प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आलेला आहे. कारण या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षपदी बसण्यासाठी एमआयडीसी, यावल, धुळे तसेच चंद्रपूर वरून आलेले अनेक जण या घोडदौडीमध्ये आहेत. मात्र या रेसमध्ये पालकमंत्री व संकटमोचक हे कोणाच्या बाजूने कौल देणार हे जरी आज सांगणे कठीण असले तरी एमआयडीसीवर पालकमंत्र्यांची मेहरबानी दिसून येत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या गेल्या काही दिवसांच्या कारभार बघितला असता गुन्हे घडल्यानंतर आरोपीचा शोध घेतला जातो आणि प्रत्येक गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे नाव येत असल्याने कार्यक्षम शाखा असल्याचे म्हटले जाते. मात्र प्रत्यक्षात ग्राउंडवर वेगळे चित्र निर्माण झालेले आहे. सट्टा. मटका, व इतर व्यवसाय मोठ्या प्रमाणात उघडलेले आहेत. पोलीस ठाण्याचा परिसर सोडला तर पोलीस स्टेशनच्या शंभर मीटर पासून अवैध व्यवसाय थाटले आहेत. त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे हे अवैध धंदे राजरोसपणे सुरु असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पदावर यांना आळा घालणे आवश्यक असून तसा अधिकारी या ठिकाणी हवा अशी मागणी होत आहे.

एल सी बीवर नजर असणारे धुळे येथील जयपाल हिरे, एमआयडीसी याच बरोबर मंत्र्याची मोठी शिफारस असलेले पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, जामनेर पोलीस ठाणे सांभाळणारे किरण शिंदे, जळगाव जिल्ह्याशी जवळचा संबंध असलेले चोपडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, नाशिक ग्रामीण एलसीबीची जबाबदारी सांभाळलेले आणि सध्या रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुटे, नागपूर स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे हे या राजकीय शर्यतीत आघाडीवर आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news