धुळे : मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी नियोजन करा – अभिनव गोयल

धुळे: पुढारी  वृत्तसेवा – मतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी एकमेकांशी समन्वय साधून पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियेाजन सभागृहात आयोजित धुळे लोकसभा मतदार संघ मतमोजणी पूर्वतयारी आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उप जिल्हा निवडणुक अधिकारी गंगाराम तळपाडे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, संजय बागडे, रोहन कुवर, तहसिलदार पंकज पवार, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश खडसे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत आदींसह नोडल अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी  गोयल म्हणाले की, मतमोजणीसाठी भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार मंगळवार, 4 जून, रोजी सकाळी 8.00 वाजेपासून शासकीय धान्य गोदाम, नगावबारी, देवपूर, धुळे येथे मतमोजणी कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी मतमोजणीसाठी भारत निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या आराखडा प्रमाणे मतमोजणी टेबल व्यवस्था, तसेच निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बैठकीची व्यवस्था करणे. मतमोजणी कक्षात अखंडीत विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरु राहील याप्रमाणे नियोजन करणे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे. उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधींची बैठकीची व्यवस्था करणे. आवश्यक तेथे लाऊडस्पिकर बसविण्यात यावे. मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळाचा अंदाज घेऊन मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सुक्ष्म निरीक्षक, शिपाई यांचे आदेश काढावेत. मतमोजणी कक्षात प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन देणे. इटीपीबीएस मोजणीसाठी आवश्यक संगणक, स्कॅनर, प्रिंटर, बारकोड रिडरची व्यवस्था करणे. आवश्यकतेनुसार सीसीटीव्हीची व्यवस्था करणे. इनकोअर प्रणालीत मतमोजणीची सर्व माहिती काळजीपुर्वक भरावी. मतमोजणी संदर्भात आवश्यक माहिती व अहवाल वेळेत आयोगास सादर करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करणे. तसेच मतमोजणीच्या परिसरात वाहनतळ, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृह, अग्निशमन यंत्र तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे, सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांवर सोपविलेली जबाबदारी प्रत्येकाने चोखपणे पार पाडणे अशा सूचना जिल्हाधिकारी  गोयल यांनी केल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news