नाशिक : धुरळा उडाला… बैलगाडी शर्यत पहायला आला अन् जीवाला मुकला | पुढारी

नाशिक : धुरळा उडाला... बैलगाडी शर्यत पहायला आला अन् जीवाला मुकला

सिडको,नाशिक : पुढारी वृत्तसेवा – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे रविवारी (दि. 26) बैलगाडी शर्यत सुरू असताना बैलगाडा अंगावरून गेल्याने पाहण्यासाठी उभ्या असलेल्या एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे.

पोपट मुंजे (४6, रा. सारूळ, ता. नाशिक) असे मृताचे नाव आहे. मुंजे शर्यत पाहण्यासाठी उभे असताना बैलगाडा त्यांच्या अंगावरून गेला. त्यांना तातडीने उपचारासाठी घोटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मुंजे यांच्यावर रविवारी (दि. 26) रात्री सारूळ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे.

हेही वाचा:

Back to top button