चिंताजनक! नाशिकमध्ये अंबड लिंकरोडला लहान मुले व्हाइटनर, गांजाच्या विळख्यात | पुढारी

चिंताजनक! नाशिकमध्ये अंबड लिंकरोडला लहान मुले व्हाइटनर, गांजाच्या विळख्यात

सिडको, नाशिक : पुढारी वृत्तसेवा – अंबड-सातपूर लिंक रोड परिसरात लहान मुले गांजा व व्हाइटनरच्या व्यसनाधिन होत असून, अनधिकृत दारू व्यवसाय, गांजा व व्हाइटनरची विक्री बंद करावी, या मागणीचे निवेदन चुंचाळे पोलिस चौकीचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांना शिंदे शिवसेना गटाचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले.

सिडको : पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांना निवेदन देताना भागवत आरोटे. समवेत सागर बोरसे, अरुण कुशारे, राम पाटील, अशोक चव्हाण, अतुल अडांगळे आदी. (छाया : राजेंद्र शेळके)

निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक २६ मधील अंबड-सातपूर लिंक रोडवरील पेट्रोल पंपासमोरील अनधिकृत दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे तेथील बालक व्यसनाधिन झाले आहेत व अनेक महिलांचे परिवार उद्ध्वस्त होत आहेत. दारू व अमली पदार्थ विक्री यांमुळे तेथील नागरिकांना वावरणे जोखमीचे झाले आहे. परिसरात गांजा व व्हाइटनरची विक्री सर्रास होत असून, लहान मुले त्याच्या आहारी जात व्यसनाधिन झाले आहेत. आपण या प्रकरणात त्वरित लक्ष देऊन हे व्यवसाय बंद करावे. याबाबत आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करूनही पोलिसांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही. तसेच दारू धंद्याच्या टपऱ्या अतिक्रमण करत महापालिकेच्या जागेत सुरू आहेत, त्या तातडीने हटवाव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी भागवत आरोटे यांच्यासह सागर बोरसे, अरुण कुशारे, राम पाटील, अशोक चव्हाण, अतुल अडांगळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button