Nashik Army Aviation | शिस्त, साहस अन् उर्जा! …. देश की रक्षा के लिए …है तयार हम! | पुढारी

Nashik Army Aviation | शिस्त, साहस अन् उर्जा! .... देश की रक्षा के लिए ...है तयार हम!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – चेता व धुव्रसारख्या हॅलिकॉप्टरच्या मदतीने अवघ्या मिनिटांमध्ये शत्रुच्या ठिकाणांचा ठाव घेताना कोणत्याही आव्हानासाठी आम्ही तयार असल्याचा संदेश भारतीय वायुदलातील जवानांनी दिला. या वेळी युद्धभुमीवरील प्रसंगाचे सादरीकरण करणाऱ्या जवानांचे शौर्य व धाडस पाहून उपस्थितांनी भारत माता की जय, वंदे मातरम‌् असा जयघोष केला.

गांधीनगर येथे आर्मी एविएशन कोर्सचे पासिंग आऊट परेड बुधवारी (दि.२२) उत्साहात पार पडले. याप्रसंगी कोम्बेट एविएटर कोर्स, एविएशन हेलिकाप्टर प्रशिक्षक कोर्स व बेसिक रिमोटली पायलेटेड एयरक्राफ्ट सिस्टम कोर्स पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांनी या परेडमध्ये सहभाग घेतला. आर्मी एविएशन कोर्सचे महानिर्देशक लेफ्टनंन्ट जनरल अजय कुमार सुरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष युद्धभुमीवरील प्रसंगाचे सादरीकरण केले.

गांधीनगर येथील काम्बेट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कूलला ३८ वर्षांची गाैरवशाली परंपरा आहे. स्कुल मध्ये विविध लढाऊ हॅलीकॉप्टर व विमानांच्या उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जाते. यंदा ४२ अधिकाऱ्यांनी कॉम्बँट एविएटर्स/आरपीएसद्वारे हॅलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण पुर्ण केले. तसेच 23 अधिकाऱ्यांनी कम्वैट हॅलिकाप्टर पायलटचे प्रशिक्षण पघेतले. एविएशन हेलिकप्टर इंस्ट्रक्टर्स कोर्स (AHIC) पूर्ण करणाऱ्या 8 अधिकाऱ्यांना क्वालिफाइड फ्लाइंग इंस्ट्रक्टर (QFI) बॅचने सम्मानित करण्यात आले. बेसिक रिमोटलि पायलटेड एयरक्राफ्ट सिस्टमचे प्रशिक्षणाबद्दल 7 तर 4 अधिकाऱ्यांना पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल सन्मानित केले गेले.

कप्तान आशिष ‘चित्ता’चे मानकरी

लढाऊ हॅलिकॉप्टर व विमानाचे प्रशिक्षणावेळी कॅप्टन आशिष यांनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर चित्ता ट्रॉफीवर नाव कोरले. मेजर सुधांशु शर्मा यांनी बेस्ट ऑफ आर्मी हॅलिकॉप्टर इंस्ट्रक्टर कोर्समध्ये प्राविण्य मिळवल्याबद्दल मेजर प्रदीप अग्रवाल ट्राफी, कप्तान कार्तिक शर्मा यांना बेसिक रिमोटली पायलटेड सिस्टममध्ये प्रथम आल्याबद्दल ट्राफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मेजर अशीत आनंद यांनी क्वालिफाइड फ्लाइंग इंस्ट्रकटर कोर्समध्ये प्रथम क्रमांक पटकावित ट्राॅफीवर नाव कोरले.

देवळाली कॅम्प : नाशिक रोड येथील कॉम्बॅट आमी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रशिक्षणार्थी पायलट तुकडीचा पासिंग आउट परेड सोहळा पार पाडला. या सोहळ्याप्रसंगी त्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली. हेलिकॉप्टरमधून उतरत प्रत्यक्ष हल्ल्याच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित रोमांचित झाले. यावेळी उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीना सुवर्णपदक आणि ट्रॉफिजने गौरविण्यात आले. त्याची ही क्षणचित्रे. (सर्व छायाचित्रे : हेमंत घोरपडे)

Back to top button