जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने पहिल्या दिवसापासून कंबर कसलेली होती. यामध्ये पथनाट्य व्हिडिओ गाणी जनजागृती यावर भर देऊन जिल्ह्यात प्रथमच 60 टक्के मतदानाच्या टक्का पार केलेला आहे यात जळगाव लोकसभेत 2.35 टक्के वाढ झाली असून रावेर लोकसभेमध्ये 2.80 टक्के मतदान वाढले आहे.
लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीमध्ये जळगाव लोकसभेमध्ये 56.12 टक्के मतदान झालेले होते तर 2024 मध्ये हे मतदान 58..47 टक्के झाले. तर रावेर लोकसभेमध्ये 2019 च्या निवडणुकीत 61.40 टक्के मतदान झाले होते. सर 2024 च्या लोकसभेमध्ये 64.28 टक्के मतदान झालेले आहे.
जळगाव लोकसभेमध्ये 58..47 टक्के मतदान झालेले आहेत. यामध्ये पुरुष 60.55 टक्के महिला 56.22 टक्के व व तृतीयपंथी लोकांनी 21.18 टक्के मतदान केले आहेत . रावेर लोकसभेमध्ये एकूण पुरुष 621983 महिला 548950 तृतीय 11 मतदान झालेले आहेत. पुरुषांची 66.50 टक्के महिला 62.38 तर तृतीयपंथी 20.37 टक्के असे एकूण 64.28 टक्के मतदान झालेले आहे.
असे मतदान झाले असून एकूण पुरुष 628123 महिला 537827 तृतीय 18 मतदान झालेले आहेत. पुरुषांची ६०.५५ टक्के, महिला 56.22 टक्के तर तृतीयपंथी 21.18 टक्के असे एकूण 58.47 टक्के मतदान झालेले आहे.