धक्कादायक! धर्मांतर करण्यासाठी आतंकवादी संघटना कार्यरत : राजा सिंह

धक्कादायक! धर्मांतर करण्यासाठी आतंकवादी संघटना कार्यरत : राजा सिंह

सिडको : पुढारी वृत्तसेवा
हिंदू मुलींना प्रेमात अडकवून त्यांच्याशी विवाह करून त्यांना धर्मांतर करण्यासाठी भाग पाडले जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात आतंकवादी संघटना काम करीत आहे. राज्यासह देशात लव जिहाद तसेच धर्मांतर मोठ्या प्रमाणात केले जात आहे. यास विरोध करण्यासाठी सर्व कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी व समाज बांधवांनी एकत्र येऊन या विरोधात एकजूट करून प्रखर विरोध गरजेचे आहे असे मत हिंदुत्ववादी संघटनेचे राजा सिंह यांनी व्यक्त केले.

छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन सकल हिंदू समाजाच्या वतीने सिडकोतील सावता नगर भागात आयोजित सभेत राजा सिंह बोलत होते. प्रारंभी संघटनेचे पदाधिकारी किशोर शिंदे यांनी सिंह यांचे स्वागत केले. पुढे बोलताना म्हणाले की राज्यात 15000 हून अधिक लव जिहादच्या केसेस असून देशात मोठ्या प्रमाणात केसेस दाखल आहेत. मात्र या विरोधात अद्यापही कडक कायदा केला जात नाही हे  दुर्दैव आहे. हिंदू लोकांनी यासाठी कडक कायदा बनवावा यासाठी एकजुटीने एकसंघ राहणे गरजेचे आहे. एकेकाला एकत्रित करून मोठ्या प्रमाणात संघटन करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशात लहुजी हात करणाऱ्यांना भीती वाटते, असेच प्रकार संपूर्ण देशात करण्यासाठी त्याच्या विरोधात एकत्रित येऊन प्रखर विरोध करणे गरजेचे आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकून हिंदू मुलींना धर्मांतर व लव जिहाद तयार केले जाते. अशाच प्रकारे हिंदू मुलींना फसवले जात आहे. छत्रपती संभाजी शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्रासाठी बलिदान दिले ते सर्वांना माहित आहे. साडेतीनशे वर्ष झाली तरी देखील आपल्याला अजूनही झगडावे लागते आहे. धर्म मोठा आहे धर्माचे रक्षण करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी धर्माधर्मासाठी बलिदान दिले आहे. त्यामुळे जगायचे असेल तर शिवाजी महाराजांसारखे आणि मरायचे असेल तर संभाजी महाराजांसारखे हे डोळ्यासमोर ठेवून सर्व हिंदूंनी एकत्र येणे एकत्र येऊन लढा देणे गरजेचे असल्याचे राजा सिह यांनी सांगितले. यावेळी किशोर शिंदे यांच्यासह सागर खराडे, मयूर बच्छाव, संतोष आव्हाड, भागवत खवणे, मुन्ना पाटील, अनिकेत पानपाटील आदींसह नागरिक संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news