जळगाव जिल्ह्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदानास उत्साहात प्रारंभ

जळगाव जिल्ह्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदानास उत्साहात प्रारंभ
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील जळगाव जिल्ह्याच्या जळगाव लोकसभेसाठी आज सोमवार (दि.१३) सकाळी सात वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. उन्हाचा कोणाचा फटका बसू नये म्हणून मतदारांनी सकाळपासून मतदानास सुरुवात करण्यासाठी आवाहन करण्यात आलेले होते. आज सोमवार (दि.१३) रोजी भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे देखील आज अभिष्टचिंतन असल्यामुळे मतदार वाढदिवसाचे त्यांना काय गिफ्ट देणार हे चार जून रोजी समजणार आहे. त्यांच्या घरी त्यांचे औक्षण करून आशीर्वाद देत सासू मंदा व सासरे एकनाथराव खडसे यांनी विजयी हो असा आशीर्वाद दिला आहे.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पारधी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पारधी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पारधी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन हजार 886 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिट बॅलेट युनिट यांच्या समस्या निर्माण झाल्या असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी टेक्निकल सपोर्ट देऊन नवीन मशीन बसून त्या ठिकाणी मतदान सुरळीत केले आहे.

भुसावळ मधील संवेदनशील भाग असलेला खडका रोड या ठिकाणी 100 मीटरचा जाहिरात सोडूनच हा नियम अधिकारी व पोलीस कर्मचारी विसरलेले दिसून येत होते. कारण 100 मीटर चे नियम धाब्यावर बसून थेट मतदान केंद्रापर्यंत मोटरसायकली देण्यात येत असल्याचे चित्र भुसावळमध्ये दिसून आले.  तसेच जिल्ह्यामध्ये 85 प्लस असलेल्या वयस्कर मतदारांनी मोठ्या उत्साहाने सकाळी मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले. यावेळी अनेक ठिकाणी मतदान केंद्र सजवून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव लोकसभेचे उमेदवार स्मिता वाघ यांनी अमळनेर तालुक्यातील डांगर येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर रक्षा खडसे यांचे सासुबाई मंदा खडसे यांनी औक्षण करून विजयाचा आशीर्वाद दिला. यावेळी रक्षा खडसे यांचे आई-वडील व सासरे एकनाथ खडसे या ठिकाणी उपस्थित होते. नागरिक मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडत असताना रावेर लोकसभेच्या खासदार पदाचे उमेदवार रक्षा खडसे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या घरी लोकशाहीचा उत्सव आणि अभिष्टचिंतन साजरा करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news