सावधान ! आगामी आठवडा उष्ण लाटांचा; ‘या’ जिल्ह्यात उष्माघाताचा अलर्ट | पुढारी

सावधान ! आगामी आठवडा उष्ण लाटांचा; 'या' जिल्ह्यात उष्माघाताचा अलर्ट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आगामी आठवडा राज्यात प्रखर उष्णतेची लाट सक्रिय होत असून हवामान शास्त्रज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण व दमट वातावरणामुळे उष्माघाताचा अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान रविवारी राज्यातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४१ अंशांवर होते. वाशिम शहराचा पारा सर्वाधिक ४३ अंशांवर पोहोचला होता. राज्यातील अवकाळी पावसाची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे बहुतांश भागात शुष्क अन् कोरडे वातावरण आहे, त्यामुळे कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहुतांश शहरांचे सरासरी कमाल तापमान 41 ते 42 अंशांवर गेले आहे. तर विदर्भ अन् मध्यमहाराष्ट्रातील काही शहरांचे तापमान रविवारी 43 अंशांवर गेले होते.

का येत आहे उष्णतेची लाट ?

पुणे वेधशाळेचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, गुजरातमधील वाळवंटातून महाराष्ट्रात यंदा सतत उष्ण वारे येत आहेत. त्याचा परिणाम कोकण, उत्तर व मध्य महाराष्ट्रावर जास्त होत आहे. त्यामुळे या भागात उष्णतेची लाट तीव्र होत आहे. त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गला उष्ण लाटांचा अलर्ट दिला आहे.

 • १ मे पर्यंत राज्यात उष्णतेच्या झळा
 • रविवार ठरला उष्ण वार, वाशिम ४३ अंशांवर
 •  पुण्यात ४१ अंश तापमानाची नोंद
 •  ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गला उष्माघाताचा अलर्ट

रविवारचे राज्याचे तापमान..

वाशिम 43, पुणे 41, मुंबई 33, अहमदनगर 40, जळगाव 41.5, कोल्हापूर 38.7, महाबळेश्वर 32.9, मालेगाव 42, नाशिक 40.1, सांगली 40.5, सातारा 39.1, सोलापूर 42, छत्रपती संभाजीनगर 39.2, परभणी 41.5, नांदेड 42.4, बीड 41.2, अकोला 41.4, अमरावती 40, चंद्रपूर 42.8, गोंदिया 37.6, नागपूर 39.7, वाशिम 43, वर्धा 41.4.

हवामान शास्त्रज्ञांचे सल्ले..

 • उन्हात जास्त वेळ एकाच
 • जागी थांबू नका.
 • पाणी भरपूर प्या.
 • हलके, सुती कपडे वापरा.
 • दुपारी 1 ते 4 पर्यंत शरीर
 • थंड ठेवा.
 • डोकेदुखी, हाता-पायात गोळे येणे, खूप थकवा, चक्कर आल्यास तत्काळ
 • डॉक्टरांना दाखवा.

हेही वाचा

Back to top button