Kolhapur Lok Sabha: शाहू महाराज यांची संपत्ती 122 कोटींच्या शेतजमिनीसह 297 कोटींची | पुढारी

Kolhapur Lok Sabha: शाहू महाराज यांची संपत्ती 122 कोटींच्या शेतजमिनीसह 297 कोटींची

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा: प्रथमच निवडणूक आखाड्यात उतरलेल्या शाहू महाराज यांची संपत्ती 297 कोटींवर आहे. यामध्ये शेती 122 कोटींची, तर 137 कोटींची गुंतवणूक आहे. शेतीबरोबरच विविध कंपन्यांचे शेअर्स व शेतजमिनीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांना वारसा हक्काने मिळालेल्या न्यू पॅलेस, फैजेवाडी येथील वाडा यांचा समावेश आहे. त्यांच्या ताफ्यात 1949 च्या व्हिंटेज मेबॅक या मेड टू ऑर्डर या वाहनाचा समावेश असून, त्याचे आजचे बाजारमूल्य 5 कोटी आहे. त्यांच्या नावे असणार्‍या वाहनांचे बाजारमूल्य 6 कोटी 19 लाख 46 हजार 430 रुपये इतके आहे. (Kolhapur Lok Sabha)

राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवी आहेत. त्यांच्या नावे कोणतेही कर्ज नाही. पोस्टात 75 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. 5,917 ग्रॅम सोने आहे. याचे बाजारमूल्य 1 कोटी 56 लाख रुपये आहे. 55 लाख रुपयांची चांदी आहे. पत्नी याज्ञसेनी महाराणी यांच्याकडे 3 कोटी 76 लाख रुपये किमतीचे सोने व 17 लाख रुपयांची चांदी आहे. (Kolhapur Lok Sabha)

जंगम मालमत्ता-147 कोटी 64 लाख 49 हजार
स्थावर मालमत्ता-49 कोटी 73 लाख 59 हजार
सोने-चांदी आभूषणे-2 कोटी 11 लाख
वाहने-6 कोटी 19 लाख 46 हजार 430 रुपये
शेती-122 कोटी 88 लाख 59 हजार
ठेवी, शेअर्स गुंतवणूक-137 कोटी 74 लाख
कर्ज नावे कोणतेही कर्ज नाही

Back to top button