जळगाव : महायुतीतही एकमेकांना विरोधकावरून चिमटे; उमेदवारी अर्जाचा 22 चा मुहूर्त 25 तारखेला गेला | पुढारी

जळगाव : महायुतीतही एकमेकांना विरोधकावरून चिमटे; उमेदवारी अर्जाचा 22 चा मुहूर्त 25 तारखेला गेला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव लोकसभेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पूर्वी २२ तारखेचा मुहूर्त काढलेला होता. मात्र २२ तारखेला अनेक लग्नाची तिथी व कान टोचणी कार्यक्रम मोठ्या संख्येने असल्याचे कारण देत ना. गिरीश महाजन यांनी उमेदवारीचा मुहूर्त २५ तारखेला म्हणजे अंतिमदिवशी ठेवला आहे. या दिनी रेकॉर्ड ब्रेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची महाजन यांनी घोषणाच करून टाकली आहे. तर महायुतीच्या मेळाव्यात मंगेश चव्हाण यांनी पारोळाचे आमदार चिमणराव पाटील यांना सांगितले की, पारोळ्यात बकरे चांगले मिळतात. त्यावर शिवणराव पाटलांनी उत्तर दिले की, बकरे कापण्याची एक जमात आमच्या पारोळ्यात आहेत. अशा कोपरखळीमधून महायुतीचा मेळावा पार पडला. महायुतीचा मेळावा सायंकाळी ६.३० वाजता सुरू होणार होता. मात्र एक तास उशिराने ना. गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आगमनानंतर मेळाव्यास प्रारंभ झाला.

जळगाव लोकसभेच्या उमेदवारांना मोठा मताधिक्याने विजयी करण्यासाठी महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन मंगळवार (दि.१६) रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेला करण्यात आले होते. मात्र उन्हाच्या चटक्यांनी कार्यकर्ते ची संख्या कमी असल्याने हा संवाद सहा वाजेचा मेळावा सव्वा सात वाजता म्हणजे एक तास उशिराने पालकमंत्री गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्या उपस्थितीनंतर सुरू झाला.

युतीच्या महामेळाव्यातत कार्यकर्ते यांची संख्या रोडावलेली पहावयास मिळाली. सूत्रसंचालन करणारे व प्रवेशद्वाराजवळ उभे असलेले किंवा भोजन कक्षात असलेले कार्यकर्ते यांनी उपस्थितांना खुर्च्यांवर आसनस्थ होण्याचे अवाहन करत होते. येऊन बसावे असे आव्हान प्रत्येक नेत्याच्या भाषणानंतर किंवा सुरुवातीला करत होते.

महायुतीच्या मेळाव्यामध्ये प्रत्येक पक्षाचे जिल्हाध्यक्षांनी आपल्या पक्षाची भूमिका घेत महायुतीचे उमेदवार यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने लागावे असे आवाहन केले. महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ यांनी सांगितले की, जळगाव लोकसभेचे मॉडेल तयार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपण कोणाची रेष पुसणार नाही तर आपल्या कामाची रेष वाढवणार असल्याचे स्पष्ट केले.

महायुतीचे समन्वयक आ. मंगेश चव्हाण
महायुतीचे समन्वयक असलेले मंगेश चव्हाण यांनी भाषणाची सुरुवातच विरोधकांना चिमटे काढून केली. पारोळा हे बकऱ्या मिळण्याचे ठिकाण असलेले आमदार चिमणराव असा उल्लेख केला तर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना फेटे बांधण्याचे व्यवसाय सुरू केला म्हणून त्याचा नाम उल्लेख केला पारोळ्याचे लोक बळीचे बकरे केव्हापासून बनायला लागले हे कळलेच नाही असा टोला त्यांनी जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार यांना लगावला. या महाआघाडीचा नेता कोण हे ठरवता येत नाही यांचे उमेदवार पूर्ण नाहीत अशी महाआघाडीची अवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. संविधानाच्या भरोशावर चहावाला देशाचा पंतप्रधान झाला हे संविधान ते कधीच बदलणार नाही. यांच्या राजकीय खुर्च्या धोक्यात आहेत म्हणून जातीपातीचे राजकारण त्यांना करायचे आहे असे ते म्हणाले. या लोकांवर बोलायची वेळ नाही आणि वेळही घालवायचा नाही चाळीसगाव मध्ये काय होते तेव्हा पाहू, असे म्हणत माजी खासदार उन्मेश पाटील यांचा समाचार घेतला.

आमदार राजू मामा भोळे
जळगाव शहरातील मतदार सुज्ञ असून ते एक लाखाहून जास्त मताधिक्य भाजपाच्या उमेदवाराला देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील
सच्चा निष्ठावंत कार्यकर्त्याला भाजपाने उमेदवारी दिलेली आहे. काही उंदरांना चिंधी मिळाली आहेत त्याचा ते अपप्रचार करीत आहेत त्याकरता शेतकऱ्यांना थेट कर्ज वाटप न करता संस्थेमार्फत कर्ज वाटपाचा निर्णय घ्यायचा आहे असे आवाहन जिल्हा बँकेच्या सदस्यांना त्यांनी मंचावर केले. बलून बधारे ऐकून कंटाळा आला आहे बलून बंधाऱ्यांपेक्षा केटी वेअर करून द्या म्हणजे शेतकरी आभार मानतील असे ते म्हणाले.

शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील
संकल्प करूया की, लोकसभेत देशात सर्वाधिक लीड हा जळगाव लोकसभेतून असेल कारण सर्व गोष्टी जुळून आल्या आहेत. आम्ही बळीचा बकरा शोधत असतो. अशी एक जमात आमच्या पारोळ्यात आहेत तुमचा तालुका ही बळीचा बकरा होणार आहे, असे त्यांनी मंगेश चव्हाण यांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

नामदार अनिल पाटील
भाषणाची सुरुवात गिरीश महाजन यांचा उद्देश सांगत तुम्ही जास्त काही बोलू नका कार्यकर्त्यांसमोर असे सांगितले. त्यांनी आपल्या मनातील शल्य सांगत काही समज, काही गैरसमज असतात. तसेच भाजपा जुनाट विचारांचा पक्ष नसल्याचे त्यांनी सुनेला उमेदवारी देऊन दाखवून दिले आहे. आता लोक काही अपप्रचार करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. आपल्या नेत्यांनी आपल्यावर जो विश्वास टाकलाय तो बळकट करण्यासाठी काम करावे. घड्याळ, धनुष्य बाण, कमळला मते दिली तरी मोदींना जाणार आहे असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी आवाहन केले. विकासाच्या व देशासाठी अजित पवारांनी हा निर्णय घेतला आहे त्यामुळे हे सुत जोडण्याचे सांगितले. काही लोक सकाळी दहा वाजेपासून माईकवर बोलत असतात. भाषणाच्या शेवटी ताई तुमचा गड तर निघून जाईल आमच्या गडासाठी अडचण येऊ देऊ नका, असे आर्जव केले.

नामदार गुलाबराव पाटील
निवडणुका नवीन नसून निवडणूकीतील प्रचार आणि प्रवास जुनाच असल्याचं मानणारा कार्यकर्ता आहे. पूर्वी रिक्षातून प्रचार करण्यासाठी फिरायचो, त्यानंतर ट्रॅक्टर मधून गेले तर मोठे गोष्ट वाटायची. आताच्या कार्यकर्त्यांना एसी कार लागतात. कार्यकर्ता हुशार झाला आहे.

काँग्रेसला चारी मुंडे कसे करायचे हे आम्हाला माहित आहे कारण आता आमच्याबरोबर अर्धी राष्ट्रवादी आहेत. प्रमोद महाजन यांचे स्वप्न होते की, शेतकरी फोनवरून सांगेल की, माझी गाय तिकडे आलेली आहे. असा काळ भाजपा सेनेच्या नेत्यांनी प्रत्यक्षात आणला आहे. तुम चोर तुम गद्दार असे आम्हाला हिणवतात ना….. मग हे सापडले खुद्दार आहेत का ? असा प्रश्न त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विचारला. ही लढाई ५४४ जागांवर नरेंद्र दामोदर मोदींचे उमेदवार आहेत. त्यांना मत द्यायचे आहेत रक्षा खडसे किंवा स्मिता वाघ यांना द्यायचे नाही, मोदींना द्यायचे आहे. कारण त्यांना देशाला तिसऱ्या क्रमांकावर आणायचे आहेत. २०४७ चे व्हिजन त्यांच्याकडे आहेत कार्यकर्ता पेटला तर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री त्यांनी दिली.

बाळासाहेब यांचे स्वप्न होते की, काँग्रेस बरोबर जर युती झाली तर शिवसेना नावाचा पक्ष विसर्जित करेल. त्यांच्या विचारांसाठी आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला आहे. निवडणुकीमध्ये आपली केलेली कामे सांगा बाकी उत्तरे देऊ नका . माजी खासदार उन्मेश पाटील यांना सांगितलले समजून घेतले असते तर त्यांना पक्षांतर करायची गरज नव्हती, वैयक्तिक टीका करू नका. असे पाटील म्हणाले.

नामदार गिरीश महाजन
युतीच्या मेळाव्याची सुरुवातच रामनामाच्या घोषाने केली. कारण कार्यकर्ते बसून मरगळ आलेली होती ती दूर करण्यासाठी राम नामाचा घोष देण्यात आला यावेळी त्यांनी उल्लेख करताना म्हणाले की निश्चितच उल्लेख केला पाहिजे तर तो शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट बदलले गेले. स्मिता वाघ व रावेर लोकसभेतील हरिभाऊ जावळे यांचेही तिकीट कापून रक्षा खडसे यांना दिले गेले. मात्र दोन दिवसाची नाराजी झटकून तिसऱ्या दिवशी पक्षाच्या कामाला ते जोमाने लागले होते. याला म्हणतात निष्ठा असे त्यांनी उदाहरण दिले. चाळीसगाव तालुका हा जुने जनता कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आजही कित्येक लोक भाजपाचा झेंडा घेऊन फिरतात. मात्र ते आमदार व खासदार बनत नाहीत. दोन महिन्यापूर्वी आलेले आमदार झाले. नंतर खासदार झाले व तिकीट कापले गेले म्हणून आठ दिवसातच निर्णय बदलला. मात्र बंदूक कारण पवार यांच्या खांद्यावर ठेवली.

जे ३० ते ३५ वर्षापासून या पक्षात होते. मी म्हणजे पक्ष , मी म्हणजे दूध संघ , मी म्हणजे जिल्हा बँक अशा अविर्भावात वागत होते. ते पक्षातून बाहेर पडल्यावर काय अवस्था झाली आहे. माझ्यावर अन्याय म्हणणारे आपण बघतच आहोत असे एकनाथ खडसे यांना त्यांनी टोला मारला.

यावेळी कार्यकर्त्यांमध्ये व नागरिकांमध्ये जी चर्चा चालू होती की तिकीट बदलणार का यावर गिरीश महाजन पूर्णविराम देत म्हणाले की, कोणतेही तिकीट बदलणार नाही. भाजपाने दोन्ही महिलांना प्राधान्य दिले आहेत आपापल्या गावाची जबाबदारी घ्या, आपापले काम पार पाडा. यावेळी ते बोलताना म्हणाले की, स्मिता वाघांनी काही मुहूर्त नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी काढलेले आहे. मात्र २२ तारखेला लग्न व कान टोचणीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असल्याने २२ तारीख ऐवजी २५ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी राज्यात अर्ज भरण्यासाठी नसलेली एवढी मोठी गर्दी दिसली पाहिजे विरोधकांना धक्काच बसला पाहिजे, असा त्यांनी यावेळी विरोधकांना इशाराच दिला.

Back to top button