गुढीपाडव्यानिमित्त नाशिककरांची खरेदीसाठी लगबग; सर्वत्र उत्साह

नाशिक : गुढी उभारतांना पारंपरिक पध्दतीने गुढीसाठी हारकडे घेताना महिला. (छाया : रुद्र फोटो)
नाशिक : गुढी उभारतांना पारंपरिक पध्दतीने गुढीसाठी हारकडे घेताना महिला. (छाया : रुद्र फोटो)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठी नविन वर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. नाशिककरांनी रविवारी (दि.७) सुट्टीचा मुहूर्त साधत पाडव्यासाठी मनमुराद खरेदी केली. सर्वत्र उत्साही वातावरण दिसून आले.

जीवनात नवचैतन्य घेऊन येणारा गुढीपाडवा मंगळवारी (दि.९) साजरा करण्यात येणार आहे. या सणासाठी बाजारपेठ सजली आहे. गुढी ऊभारण्यासाठी आवश्यक वेळूच्या काठ्या, विविधरंगी रेशमी वस्त्रे, साखरेच्या हारकडे विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले आहेत. शहरातील मुख्य भाग असलेल्या रविवार कारंजा, मेनरोड, सराफ बाजार आदी परिसरात या साहित्याची दुकाने थाटली आहेत. नाशिककरांनी रविवारी सहकुटूंब या साहित्याची खरेदी केली.

गुढी ऊभारण्यासाठी आवश्यक असलेली वेळूची काठीचे दर ५० ते २०० रुपयांपर्यंत आहेत. तसेच रेशमी वस्त्रांसाठी १०० ते ५०० रुपये मीटर दर मोजले जात आहे. याशिवाय हारकड्यांचे दर ५० ते १२० रूपयांपर्यंत आहे. नागरीकांनी या साहित्याची मनमुराद खरेदी केली. दरम्यान, शहरातील पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिकरोड तसेच इंदिरानगर आदी भागांमध्येही गुढीपाडव्याच्या खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला.

नाशिक : गुढीपाडव्यानिमित्त बाजारात दाखल झालेल्या मिनीगुढी न्याहाळताना बच्चेकंपनी.
नाशिक : गुढीपाडव्यानिमित्त बाजारात दाखल झालेल्या मिनीगुढी न्याहाळताना बच्चेकंपनी.

मिनीगुढीला पसंती
गेल्याकाही वर्षापासून गुढीपाडव्यासाठी बाजारपेठेत खास मिनीगुढी विक्रीसाठी दाखल होते. यंदा ही विविध आकार व विविधरंगी रेशमी वस्त्रे असलेल्या मिनीगुढी बाजारात ऊपलब्ध झाल्या आहेत. साधारणत: शंभर रुपयांपासून ते चारशे रुपयांपर्यंत या गुढ्यांचे दर आहेत. पर्यावरणपुरक या मिनी गुढी नाशिककरांच्या पसंतीस उतरत आहेत.

नाशिक : गुढी उभारणीसाठी वेळूची काठी घेताना नाशिककर. (छायाचित्रे : रुद्र फोटो)
नाशिक : गुढी उभारणीसाठी वेळूची काठी घेताना नाशिककर. (छायाचित्रे : रुद्र फोटो)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news