नंदुरबार : मोदी सरकारचे कार्य घराघरापर्यंत पोहोवूया: खा. डॉ. हिना गावित

नंदुरबार : मोदी सरकारचे कार्य घराघरापर्यंत पोहोवूया: खा. डॉ. हिना गावित

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
'युवा, महिला, बेरोजगार आणि श्रमिक यांच्यासह प्रत्येक घटकासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारने राबवलेले जनकल्याणाचे कार्य घराघरापर्यंत पोहोचवू या आणि फिर एक बार मोदी सरकार हा नारा सत्यात उतरवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करूया' असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार महासंसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केले.

शनिवार (दि.६) रोजी नंदुरबार येथे भारतीय जनता पार्टीच्या विजय पर्व या प्रमुख कार्यालयात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देऊन गावित यांनी आवाहन केले. याप्रसंगी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या ध्वजाला वंदन करण्यात आले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, डॉ.सपना अग्रवाल यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ व जुने कार्यकर्ते शंकरलाल अग्रवाल, संजय साठे, प्रकाश चौधरी, माणिक माळी यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news