मुंबई : गिरगाव सि पी टॅंक सर्कलजवळ सात दुकाने आगीत जळून खाक | पुढारी

मुंबई : गिरगाव सि पी टॅंक सर्कलजवळ सात दुकाने आगीत जळून खाक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गिरगावातील सि पी टॅंक सर्कल  परिसरातल्या कस्तुरबा गांधी चौक बस थांब्याच्या पाठीमागे असलेल्या दुकानातील विद्युत वाहिनीमध्ये गुरवारी (दि. ४) संध्याकाळी ७:४० दरम्यान अचानक भीषण आग होती. या आगीत एकामागून एक अशी  ७ दुकाने भस्मोसात झाली. तर २ चार चाकी वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. यापैकी काही दुकाने स्व मालकीची होती तर काही भाड्याने देण्यात आलेली होती. संध्याकाळच्या वेळेस सि पी टॅंक सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते लोक अग्निशमन दलास फोन करण्या ऐवजी फोटो आणि व्हिडिओ काढण्यात दंग झाले होते.त्याच वेळेस तिथून जाणाऱ्या एका समाजसेवकाने फोन करून अग्निशमन दलास आगीची माहिती दिली असता अग्निशमन दलाने गिरगावच्या गल्ली बोळतन रस्ता काढत पाचारण केल्यावर पंधरा-वीस मिनिटातच आग वीजवून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले जवळच्या इमारतीतील विद्युत वाहिन्या काही काळाकरता सुरक्षेच्या उपायाकरता बंद ठेवण्यात आल्या होत्या या आगीत येथील दुकानदारांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत होते. दुकानांन मधील विद्युत जोडणी पूर्ववत करण्याकरता साधारण पंधरा दिवसांचा अवधी लागणार असल्याचे बेस्ट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Back to top button