काँग्रेसमधून हकालपट्टी होण्‍यापूर्वीच मी राजीनामा दिला होता : संजय निरुपम | पुढारी

काँग्रेसमधून हकालपट्टी होण्‍यापूर्वीच मी राजीनामा दिला होता : संजय निरुपम

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस पक्षाने मला हकालपट्टीची नोटीस बजावण्‍यापूर्वीच मी पक्षाचा सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला होता, अशी माहिती काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाचची ही तत्‍परता पाहून मला आनंद झाला, असा टोलाही त्‍यांनी लगावला आहे.

संजय निरुपम यांनी ट्विट केले आहे की, काल रात्री पक्षाला माझा राजीनामा पत्र मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी माझी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. एवढी तत्परता पाहून आनंद झाला. फक्त ही माहिती शेअर करत आहे. मी आज 11.30 ते 11.30 च्या दरम्यान सविस्‍तर निवेदन देईन.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांची बुधवारी ( दि. ३ एप्रिल) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली  हाेती. महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी निरुपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते सातत्याने पक्षविरोधी वक्तव्ये करत होते.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अनुशासनहीन आणि पक्षविरोधी वक्तव्याच्या तक्रारीनंतर संजय निरुपम यांची हकालपट्टी करण्यास मंजुरी दिल्याचे सांगितले आहे. संजयला सहा वर्षांपासून पक्षाकडून दार दाखवण्यात आले आहे. हा आदेश तात्काळ लागू होईल असेही सांगण्यात आले हाेते.

काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीतून निरुपम यांचे नाव काढून टाकल्याचे यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. याशिवाय निरुपम यांनी पक्ष आणि राज्य युनिट नेतृत्वाविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही सुरू करण्यात आली आहे.

Back to top button