Jalgaon Crime | बलात्कार आणि खून करणाऱ्या आरोपीला तीन तासात अटक | पुढारी

Jalgaon Crime | बलात्कार आणि खून करणाऱ्या आरोपीला तीन तासात अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
चाळीसगाव तालुक्यांतील वरखेडे बु. येथील महिलेशी असलेल्या प्रेम संबंधातून मध्यरात्री आरोपी हा मयत महीलेस भेटण्यास गेला. मक्याच्या शेतात भेट होऊन त्यानंतर त्यांच्यात आपसात शाब्दीक वाद झाला. त्या रागाच्या भरात आरोपीने मयत महीले सोबत अतिप्रसंग करुन धारदार शस्त्राने हल्ला करुन जिवे ठार मारुन शेता शेजारी असलेल्या गिरणा नदीच्या पात्रातील वाळूत अर्धवट मयत महिलेच प्रेत गाडले. याची माहिती पोलिसांना मिळताच तीन तासात तपासचे चक्रे फिरवत आरोपी संतोष धोंडू भिल (रा. पिंपळवाड म्हाळसा ता. चाळीसगाव) याला अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवार (दि.३) रोजी सकाळी वरखेड बु. येथील पोलीस पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक संदिप परदेशी यांना त्यांचे मोबाईलव्दारे संपर्क करुन कळविले की, वरखेडे बु. गावासमोर गिरणा नदी पात्रातील रेतीत एक प्रेत स्त्री जातीचे अर्धवट स्थितीत रेतीमध्ये पुरलेले आढळले. तत्काळ पोलीस ठिकाणी वरखेडे गावातील व आजुबाजुचे परीसरातील अंदाजे २०० ते ३००  लोक हजर होते. पोलीस पाटीलसह पथकाने घटनास्थळी पंचनामा करुन वरिष्ठ अधिकारी तसेच तहसिलदार, वैदयकीय अधिकारी यांना घडलेला प्रकार कळविणयात आला. जळगाव येथील फॉरेन्सीक पथक तसेच गुन्हे शोध पथक, जळगाव, डॉग स्कॉड, जळगाव यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. फॉरेन्सीक पथक व डॉग स्कॉडच्या मदतीने उपयुक्त पुरावे तत्काळ जप्त करण्यात आले होते.

तहसिलदार चाळीसगाव यांचे प्रतिनिधी समोर फॉरेन्सीक पथकाच्या मदतीने मयत महीलेचे प्रेत बाहेर काढले असता मयत महिला ही मायाबाई सजन मोरे (वय 35 रा. वरखेडे खु. ता. चाळीसगाव) असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या डोक्यावर दोन्ही कानाजवळ डोळयाजवळ, छातीवर, मांडीवर धारदार हत्याराने व दगडाने केलेल्या जखमा आढळल्या. तसेच जिवे ठार मारुन गिरणा नदी पात्रातील वाळूतील ढिगाऱ्यातील अर्धवट गाडण्यात आलेला मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. गुन्हयांच्या तपास कामात वरखेडे बु, शिवारातील ज्ञानेश्वर शांताराम निरमली यांच्या मक्याचे शेतात मिळालेल्या पुराव्यावरुन मयत मायाबाई सजन मोरे हिच्यावर बलात्कार झाल्याचे ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे झालेल्या शवविच्छेदन अहवालाच्या तपासाअंती निदर्शनास आले. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, कविता नेरकर, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयातील संशयीत आरोपी याची गोपनीय माहिती हस्तगत करण्यात आली. गुन्हयांतील आरोपीस तीन तासात ताब्यात घेवून पोलीस खाकी दाखविल्यानंतर आरोपीने उलगडा केला. आरोपी संतोष धोंडू भिल (रा. पिंपळवाड म्हाळसा ता. चाळीसगाव) व मयत महिला एकाच समाजाचे असून वरखेडे गावपासून तीन किलोमिटर अंतरावर आरोपी वास्तव्यास होते.

Back to top button