काळजी घ्या! उष्णतेपासून दिलासा नाहीच; महाराष्ट्रासह दक्षिण भारतात उष्णतेचा कहर | पुढारी

काळजी घ्या! उष्णतेपासून दिलासा नाहीच; महाराष्ट्रासह दक्षिण भारतात उष्णतेचा कहर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह दक्षिण भारतात शुक्रवार, 5 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट सक्रिय राहणार आहे. तसेच 7 व 8 एप्रिल रोजी राज्यात पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, मंगळवारपासून पूर्वोत्तर भारतात पाऊस सुरू झाला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय होत असला तरी यंदा त्याचा महाराष्ट्राला पावसाच्या रूपाने फार कमी फायदा झाला. मार्चमध्ये राज्यात खूप कमी पाऊस याच कारणामुळे झाला. त्यामुळे 6 एप्रिलपासून हिमालयात पश्चिमी चक्रवात सुरू होत आहे. हिमालयापासून उत्तर भारतापर्यंत तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातही 6 व 7 एप्रिल रोजी कोकण वगळता सर्वच भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात उष्णतेची लाटही तेवढीच सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे.

मंगळवारचे कमाल तापमान

मालेगाव 40 (21.2), पुणे 39.6 (18.9), अहमदनगर 39 (19.4), जळगाव 40 (21), कोल्हापूर 38.5 (23. 4) महाबळेश्वर 32.9 (21.2), नाशिक 37.8 (18.6), सांगली 39.3 (23.9), सातारा 39 (22.2), सोलापूर 41.5 (26.6), छत्रपती संभाजीनगर 38.8 (24.2), परभणी 40 (24), बीड 40.2 (22.5),. अकोला 40.9 (23.6), अमरावती 40.4 (24.5), चंद्रपूर 40.2 (22.4), गोंदिया 39.5 (21.4), नागपूर 40.6 (21.2)

हेही वाचा

Back to top button