काळजी घ्या ! राज्यात वाढणार उष्णतेची लाट; ‘हा’ भाग असेल अधिक उष्ण | पुढारी

काळजी घ्या ! राज्यात वाढणार उष्णतेची लाट; 'हा' भाग असेल अधिक उष्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सोमवारपासून उष्णतेची लाट सक्रिय झाली असून, आगामी पाच दिवसांत ही लाट अजून तीव— होईल. कमाल तापमानाचा पारा 2 ते 3 अंशांनी वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, हिमालयात नवा पश्चिमी चक्रवात सक्रिय होत आहे. त्यामुळे राज्यात 5 ते 8 एप्रिलदरम्यान पावसाचा अंदाज आहे. एप्रिल सुरू होताच राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट तीव्र होत आहे. मध्य भारतात कमाल तापमानाचा पारा आणखी 2 ते 4 अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सोमवारी दिला आहे. दरम्यान, हिमालयात नवा पश्चिमी चक्रवात तयार होत असून, त्यामुळे 5 ते 7 एप्रिलदरम्यान हिमालय, पं. बंगाल, पूर्वोत्तर राज्ये, बिहार, उत्तर प्रदेशपर्यंत पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही या दरम्यान मध्य महाराष्ट्र, विदर्भ अन् मराठवाड्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

असा आहे पावसाचा अंदाज

– मध्य महाराष्ट्र : 5 ते 7 एप्रिल
– विदर्भ : 5 ते 7 एप्रिल
– मराठवाडा : 5 ते 7 एप्रिल

सोमवारचे कमाल- किमान तापमान

सोलापूर 41 (26.3), पुणे 38.4 (22), अहमदनगर 21.3 (23), जळगाव 40 (20.6), कोल्हापूर 37.6 (24.8), महाबळेश्वर 31.5 (21.1), मालेगाव 39.4 (21.6), नाशिक 37.6 (21.3), सांगली 39.4 (24.9), सातारा 37.7 (24.5), छत्रपती संभाजीनगर 38.4 (23.8), परभणी 36.5 (24), नांदेड 36.2 (24.6).

हेही वाचा

Back to top button