नाशिक : पिंपळगाव खांब परिसरातील रहिवाशांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; बिबट्या सापडला

इंदिरानगर : पोरजे मळा परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या.
इंदिरानगर : पोरजे मळा परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या.

इंदिरानगर : पुढारी वृत्तसेवा
पाथर्डी व पिंपळगाव खांब परिसरात दहशत घालणाऱ्या व वेळप्रसंगी हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. पाथर्डी – नांदूर मार्गावर असलेल्या पोरजे यांच्या मळ्यात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. आठ ते नऊ वर्षाचा हा नर बिबट्या आहे.

काही महिन्यांपासून पाथर्डी, पिंपळगाव खांब परिसरात भक्ष व पाण्याच्या शोधात बिबटे नेहमीच आढळून येत असतात. शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना बिबट्याने लक्षदेखील केले होते. त्यामुळे मेळ भागातील शेतकरी व ग्रामस्थ दहशतीखाली होते. भयभीत शेतकऱ्यांचे वनविभागाच्या कार्यवाहीकडे लक्ष लागले होते. वनविभागाने ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बिबट्याच्या ठशाचे नमुने घेत सुखदेव पोरजे यांच्या मळ्यामध्ये पिंजरा लावला होता. अपेक्षेप्रमाणे बिबट्या पिंजऱ्यात अडकला. नाशिक पश्चिम वन विभागाचे वनसंरक्षक अधिकारी पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग परिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, विजयसिंह पाटील, अशोक खानझोडे यांनी बिबट्याला जेरबंद केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news