नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई – आग्रा महामार्गावरील प्रवास महागणार आहे. पिंपळगाव बसवंतजवळील टोल नाका येथे येत्या १ एप्रिलपासून टोल दरवाढ लागू होणार आहे. नॅशनल हायवे प्राधिकरणाने अधिकृत नोटिफिकेशन काढून यासंदर्भातील टोल दरवाढ केली आहे. यात कार, जीप, व्हॅन या वाहनांच्या एकेरी फेरीसाठी २२५ रुपये, मिनी बस व एलसीव्ही व एलजीव्ही वाहनांसाठी ३६५ रुपये, बस व ट्रककरिता ७७० रुपये, थ्री एक्सल कमर्शिअल वाहनांसाठी ८४० रुपये, चार ते सहा एक्सल वाहनांसाठी १२०५ रुपये, तर अवजड वाहनांसाठी १४७० रुपये टोल आकारणी करण्यात येणार आहे.
उपरोक्त दर एकेरी फेरीसाठी असून टोल भरल्यानंतर २४ तासांच्या आत परतीचा प्रवास करणाऱ्या वाहनांना २५ टक्के सूट मिळेल. तर महिन्यात ५० एकेरी फेऱ्या करणाऱ्या वाहनांना ३३ टक्के सूट देण्यात आली आहे. टोल नाका परिसरातील २० किलोमीटरमध्ये असणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या अव्यावसायिक वाहनांसाठी महिन्याचा पास ३४० रुपये ठेवण्यात आला आहे. ही टोल आकारणी फक्त फास्टटॅगद्वारे होणार असून, याचा लाभदेखील फास्टटॅगधारकांनाच मिळणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
नॅशनल हायवे प्राधिकरणाने टोल दरवाढीसंदर्भात नुकतेच नोटिफिकेशन जारी केले असून, त्यानुसार नवीन दर निश्चित केले आहेत. दि. १ एप्रिलपासून वाहनधारकांना हे दर लागू होतील. यात फास्टटॅग वाहनधारकांना एकाहून अधिक फेऱ्या करणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. – आत्माराम नथले, टोल व्यवस्थापक, पिंपळगाव टोल नाका.
पिंपळगाव बसवंत गावाजवळील टोल प्लाझाचे नवीन दर असे…
अनु. वाहनाचा प्रकार एकेरी फेरी एकाहून अधिक खेपांसाठी मासिक पास एकाच जिल्ह्यांतील नोंदणीकृत
क्र. शुल्क रुपयांत (एक दिवसात जास्तीत जास्त २ महिन्यातील ५० एकेरी व्यावसायिक वाहनांसाठी
एकेरी खेपांसाठी) शुल्क रुपयांत फेऱ्यांसाठी शुल्क रुपयांत शुल्क रुपयांत
१. कार/जीप/व्हॅन २२५ ३४० ७५८० ११५
/एलएमव्ही
२. एलसीव्ही/एलजीव्ही ३६५ ५५० १२२४५ १८५
/मिनी बस
३. बस/ट्रक ७७० ११५५ २४६६० ३८५
४. तीन ॲक्सल ८४० १२६० २७९९५ ४२०
कमर्शियल वाहन
५. एचसीएम/ईएमई
/एमएव्ही (४ ते ६ ॲक्सल) १२०५ १८१० ४०२४० ६०५
६. अवजड वाहन
(७ किंवा अधिक ॲक्सल) १४७० २२०५ ४८९९० ७३५
टोल प्लाझाच्या २० कि. मी. पर्यंतच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांच्या अव्यावसायिक वाहनांसाठी २०२४-२५ या वर्षासाठी मासिक पासचे दर रु. ३४०/-