Lok Sabha Election 2024 | ‘चळवळीला लाचार करण्याचा प्रयत्न मान्य नाही’; आंबेडकरांनी ‘मविआ’ला सुनावले | पुढारी

Lok Sabha Election 2024 | 'चळवळीला लाचार करण्याचा प्रयत्न मान्य नाही'; आंबेडकरांनी 'मविआ'ला सुनावले

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाची चळवळीची भूमिका आहे. परंतु जर आपल्या चळवळीला लाचार करण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख  डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट भाषेतच महाविकास आघाडीला सुनावले. ते आज (दि.२६) माध्यमांशी बोलत होते. (Lok Sabha Election 2024)

व्यक्ती हा सार्वजनिक आहे. त्यामुळे त्याची भूमिकादेखील सार्वजनिक सर्वाना सामावून घेणारी असली पाहिजे. मविआसोबत युतीत अडचणी येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद येऊ दिला नाही, असेही आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीच्या  भूमिकेला फुले, शाहू, आंबेडकरी जनतेचा पाठिंबा असेल असे आवाहनदेखील डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. (Lok Sabha Election 2024)

मविआकडून वंचित बहुजन आघाडीला ४ ऐवजी ५ जागांचा प्रस्ताव; आंबेडकर

देशभरात लोकसभा रणसंग्राम सुरू झाला आहे. दरम्यान, राजकीय पक्षांकडून याद्या जाहीर करण्यात आल्या असून, अनेक पक्षातील उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केला आहे. इंडिया आघाडीचा भागा असलेली राज्यातील मविआमध्ये मात्र अद्याप अलबेल आहे. वंचित बहुजन आघाडी मविआ सोबत येणार की स्वतंत्र लढणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. तर मविआने आता वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीसाठी ४ ऐवजी ५ जागा देण्य़ात आल्या आहेत. अशी माहिती डॉ. आंबेडकर यांनी आज (दि.२६) माध्यमांशी बोलताना दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

Lok Sabha Election 2024 : ‘वंचित’बाबत मविआची वेट अँड वॉच भूमिका

पुढे आंबेडर म्हणाले, मविआने सध्या वंचित बहुजनला ४ ऐवजी ५ जागांचा प्रस्ताव दिला आहे. मविआने वंचितला आणखी एक जागा वाढवली आहे. यावरून वंचित बाबात मविआची वेट अँड वॉच भूमिका असल्याचे पाहायला मिळत आहे. अशी माहिती डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. (Lok Sabha Election 2024)

डॉ. प्रकाश आंबेडकर आज जाहीर करणार भूमिका

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा वाद २६ मार्चपर्यंत न मिटल्यास आम्हालाही भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा देणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे मंगळवारी (दि. २६) आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडणार की तिसर्‍या आघाडीत सहभागी होण्याबाबत घोषणा करणार, याकडे राजकीय वर्तुळासह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Lok Sabha Election 2024)

अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार?

मविआमध्ये १५ जागांवर तिढा कायम आहे. तो त्यांनी प्रथम सोडवावा. काँग्रेसने ७ जागा कळवल्यास आम्ही त्यांना पाठींबा देऊ. मी वंचित बहुजन आघाडीकडून २७ मार्च रोजी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहे, असे त्यांनी सांगितले. (Lok Sabha Election 2024)

कोल्हापुरात शाहू महाराजांना ‘वंचित’चा पाठिंबा

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदार संघात शाहू महाराज छत्रपती यांना वंचितचा पाठिंबा असेल, अशी मोठी घोषणा नुकतीच डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, “आमचं टार्गेट भाजप आहे.

संविधान बदण्यासाठीच भाजपकडून ४०० पारचा नारा; आंबेडकरांचा आरोप

संविधान बदलण्यासाठीच भाजपकडून ४०० पारचा नारा दिला जात आहे. परंतु मला आजही १९४९ ची RSS ची शपथ आजदेखील आठवते, त्यावेळी त्यांनी संविधान बदलण्याची घोषणा केली होती. महायुतीकडे उमेदवार नाहीत, त्यामुळे भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचे आंबेडकर म्हणाले. जेव्हा महायुती ४०० पार म्हणतात, तेव्हा ते राज्यशासन करण्यासाठी नाही , तर राज्यघटना बदलण्यासाठीच असा आरोपही वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर त्यांनी केला आहे. (Lok Sabha Election)

हेही वाचा:

Back to top button