Weather Update : काळजी घ्या ! राज्यात तापमानाचा पारा वाढताच; ‘हा’ भाग 40 अंशांवर | पुढारी

Weather Update : काळजी घ्या ! राज्यात तापमानाचा पारा वाढताच; 'हा' भाग 40 अंशांवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विदर्भात झालेली गारपीट आणि पावसामुळे कमाल तापमानाचा पारा खाली घसरला होता. मात्र, पुन्हा तापमानात वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. 22) मालेगाव शहराचे तापमान 40 अंशांवर गेले होते. हे राज्यात सर्वाधिक तापमान आहे. कोरड्या हवामानामुळे कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. तामिळनाडूपासून ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे.

मात्र, त्याचा प्रभाव कमी होत चालला आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होत चालली असून, किमान तापमानातही हळूहळू वाढ होत चालली आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सध्या कोरडे हवामान आहे. त्यात दक्षिण भारताकडून राज्याकडे उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे कडक ऊन वाढू लागले आहे. कडक उन्हाचा कडाका अगदी सकाळपासूनच होऊ लागला असून, दुपारी तर कडक उन्हामुळे नागरिक घामाघूम होऊ लागले आहेत.

हेही वाचा

Back to top button