Jalgaon Political News | वरणगाव शहरातून खडसे यांच्या उमेदवारीला कोण करतंय विरोध

Jalgaon Political News | वरणगाव शहरातून खडसे यांच्या उमेदवारीला कोण करतंय विरोध

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने राजीनाम्याचे सत्र आता वरणगाव शहर, परिसरात पोहोचले आहे. वरणगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मिळून रविवारी (दि.१७) रोजी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे. वरणगाव भागातील भाजपच्या २०० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला भाजपमधून तीव्र विरोध होत आहे. याचे पडसाद आता वरणगाव शहर व परिसरात उमटत आहे. रक्षा खडसे यांनाच पुन्हा उमेदवारी नकोच अशी भूमिका घेत वरणगाव भागातील भाजपच्या २०० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.  खासदार रक्षा खडसे या भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना जास्त मदत करतात. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांकडून भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर देखील खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. त्यावेळी रक्षा खडसे यांनी एकदाही राष्ट्रवादीला विरोध केला नाही. त्यामुळे भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी सामूहिक राजीनामा देणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सामूहिक राजीनामा देणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष सुनील काळे, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ, ओबीसी शहराध्यक्ष गोलू राणे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष आकाश निमकर, शहराध्यक्ष सुनील माळी, तालुका उपाध्यक्ष माला मेढे, शामराव धनगर, महिला शहर अध्यक्ष प्रणिता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस डॉ . सादिक शेख, जिल्हा उपाध्यक्ष हजी फायुम, तालुका अध्यक्ष साबीर कुरेशी तालुका सरचिटणीस रमेश पालवे, नाना चुधरी, हितेश चौधरी, सुशीलकुमार झोपे, शेतकी संघ संचालक सुशील झोपे विविध कार्यकारी संचालक अनिल वंजारी, गुड्डू बढे, कायदे आघाडी सरचिटणीस ऍड. ए.जी. जंजाळे, डॉ.नी.तू.पाटील यांच्यासह २०० जणांचा समावेश असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news