Maharashtra Politics : भुसे माझ्याशी उद्धटपणे बोलले; थोरवेंचा यांचा आरोप | पुढारी

Maharashtra Politics : भुसे माझ्याशी उद्धटपणे बोलले; थोरवेंचा यांचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क :  विधीमंडळाच्या लॉबीत आज (दि.१) शिंदे गटातील कर्जदचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भूसे आपआपसात भिडले. या दोघांच्यात वाद होऊन धक्काबुक्की झाल्याचे कळते. या दोघांमधील वाद सोडवण्यासाठी मंत्री शंभुराज देसाई यांनी मध्यस्थी केली. दोघांच्यात वाद झाला नसल्याचा दावा शंभुराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना केला. दरम्यान महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे यांच्यावर आरोप करत म्हटलं आहे की, “दादा भुसे माझ्याशी उद्धटपणे बोलले” (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : थोरवे यांचे आरोप

विधिमंडळातील झालेल्या वादासंदर्भात बोलत असताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, दादा भुसे यांनी माझ्या मतदारसंघातील रस्त्याचे काम हे जाणीवपूर्वक केलेले नाही. माझ्याशी ते बोेलत असताना उद्धटपणे बोलले. आता दादा भुसे हे काय प्रतिक्रिया देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहीले आहे.

कोणताही वाद झाला नाही : दादा भुसे

सभागृहात दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील झालेल्या वादावरुन गोंधळ झाला. विरोधी पक्षातील नेत्यांनी यावरुन सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार बोलताना म्हणाले, वाद झाला नव्हता तर थोरवेंनी का कबुली केली. थोरवेंच्या वक्तव्याची चौकशी करावी. दरम्यान विरोधी पक्षाने केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना दादा भुसे म्हणाले, ” महेंद्र थोरवे हे माझे सहकारी मित्र आहेत. धक्काबुक्कीचा कोणताही प्रकार झालेला नाही. मी हा विषय संपवतो. सीसीटीव्ही तपासायचे असतील तर तपासा असं आवाहन विरोधी पक्षाला दादा भुसे यांनी केले. पुरावे मिळाल्यास खुशाल हाणामारीचे सीसीटीव्ही दाखवू शकता.

काय आहे प्रकरण

विधीमंडळाच्या लॉबीत आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भूसे यांच्यात वाद झाला अशी चर्चा होवू लागली. दरम्यान माध्यमांशी बोलत असताना शंभुराज देसाई म्हणाले, “दोघे एकमेकांना भिडले, वाद झाला, असे काहीच घडले नाही. मोठ्या आवाजात बोलले म्हणजे वाद झाला का?. असा सवाल शंभुराज देसाई यांनी केला. ”मी दोघांनाही लॉबीत घेऊन गेलो. त्यांच्याशी चर्चा केली. उद्या आमदारांचे काम कसे मार्गी लावता येईल. यावर आम्ही चर्चा करु. त्यांचे काम मार्गी लावू. दोघांबरोबर मी होतो. दोघांच्यात वाद अथवा धक्काबुक्की झाली नाही,” असे त्यांनी म्हटले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर बोलणे टाळले.”

सरकारचं गँगवार सभागृहात पोहोचलंय- दानवे

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, राज्यात गुंडाराज सुरु असल्याची टीका केली आहे. सत्ताधारी आमदारांचा राडा होणे दुर्देवी आहे. त्यांना जनतेशी काही देणेघेणे नाही. सरकारचं गँगवार सभागृहात पोहोचले आहे, अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा :

Back to top button