Jalgaon Crime news | दोन पिस्तूल जिवंत काडतुससह आरोपी अटकेत | पुढारी

Jalgaon Crime news | दोन पिस्तूल जिवंत काडतुससह आरोपी अटकेत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भुसावळ शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पांडुरंग टाकीजवळ एका इसमाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून दोन पिस्तूल व एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच आरोपी जवळून एक लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल बुधवार (दि.२८) रोजी जप्त करण्यात आला आहे.

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघम यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पांडुरंग टॉकीजजवळ एक संशयित आढळून आला. पडघम यांनी पोलीस उपनिरीक्षक राजू विष्णू सांगळे, पोलीस हेड काॅन्सटेबल निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, प्रशांत निळकंठ, सोनार यांना पाचरण करुन पथकास आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलीस पथकाने भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीजच्या मागील दगडी पुलाजवळ संशयित इसम KTM 125 कंपनीची मोटार सायकलस्वार संशयित आरोपी देवानंद विकास कोळी (वय 20 वर्ष रा. तुकाराम नगर, पाडळसा ता. यावल) मिळून आला. पोलीस पथकाने त्यास अडवून ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस तसेच 40 हजार रुपये किमतीची एक लोखंडी गावठी पिस्टल मिळून आल्या. याचबरोबर ५०० रुपयाची जिवंत काडतूस, 25 हजार रूपये किमतीचा आय फोन 11 प्रा. कंपनीच्या मोबाईल, ५० हजाराची केटीएम १२५ कंपनीची भगव्या रंगाची मोटारसायकल विना नंबर प्लेट असा एक लाख 15 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस  हेड कॉन्सटेबल निलेश बाबुलाल चौधरी यांनी दिलेल्या फिर्याद वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button