Nashik | एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचा उद्या भूमिपूजन सोहळा | पुढारी

Nashik | एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचा उद्या भूमिपूजन सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूट टाटा मेमोरियल सेंटर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने साकारल्या जाणाऱ्या विशेष सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा आणि एसएमबीटी केअर प्लस, एसएमबीटी बोन मॅरो ट्रान्सप्लांट, एसएमबीटी टेलीमेडिसिन, एसएमबीटी ई-कॅम्पस या विविध सेवा उपक्रमांचा शुभारंभ बुधवार (दि २८) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पद्मविभूषण व प्रख्यात शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते होणार आहे. (SMBT Cancer Institute Largest Charitable Hospital in Nashik)

याप्रसंगी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, माजी विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, इम्युनोॲक्टचे संस्थापक डॉ. राहुल पूरवार यांची उपस्थिती राहणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात अत्याधुनिक, दर्जेदार उपचार सुविधा परवडणाऱ्या दरांत एसएमबीटी हॉस्पिटलने उपलब्ध करून दिल्या आहेत. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आजवर २९ लाख ३० हजार ५९८ रुग्णांची तपासणी करून यशस्वी निदान करण्यात आले आहे. आंतररुग्ण विभागात दाखल झालेल्या ३ लाख ९० हजार रुग्णांवर यशस्वी उपचार व १ लाख १३ हजार ११७ पेक्षा अधिक रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. (SMBT Cancer Institute Largest Charitable Hospital in Nashik)

हॉस्पिटलच्या वतीने रुग्णांसाठी स्पेशल रूम उपलब्ध करून देण्यात आले असून, यास एसएमबीटी केअर प्लस असे नाव देण्यात आले आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी ही विंग असून, अतिशय माफक दरात रुग्णांना याठिकाणी स्वतंत्र रूम्स दिल्या जाणार आहेत. यासोबतच बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुविधा कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी उपलब्ध झाली असून, जीन सेल थेरपीच्या माध्यमातून अत्याधुनिक उपचार राज्यभरातील कर्करोग रुग्णांवर होणार आहेत. उपचार झाल्यानंतर रुग्णांचा फाॅलोअप टेलीमेडिसिन हबच्या माध्यमातून एसएमबीटी हॉस्पिटलशी सलग्न असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन एसएमबीटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर करतात. (SMBT Cancer Institute Largest Charitable Hospital in Nashik)

ब्लड कॅन्सरवर अत्याधुनिक उपचार
एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आता ब्लड कॅन्सरग्रस्त रुग्णांवर अत्याधुनिक उपचार करणे शक्य झाले आहे. कार-टी सेल थेरपीवर भारतीय संशोधन असलेल्या इम्युनोॲक्ट संस्थेसोबत एसएमएसबीटी हॉस्पिटलचा करार झालेला असून, क्लिनिकल ट्रायलदरम्यान दोन रुग्णांवर याठिकाणी यशस्वी उपचार झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्हीही रुग्ण कर्करोगमुक्त झाले आहेत. यापुढेही हे उपचार एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध असणार आहेत.

Back to top button