Yuva Pudhari 2024 : हृद्य सोहळ्यात ‘युवा पुढारी’ जनांचा सन्मान | पुढारी

Yuva Pudhari 2024 : हृद्य सोहळ्यात 'युवा पुढारी' जनांचा सन्मान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रगल्भ सामाजिक दृष्टिकोन, लोकाभिमुख नेतृत्व आणि कर्तव्यपरायणता या त्रिसूत्रीचा अनोखा मिलाफ साधणाऱ्या ३१ युवा जनांचा दैनिक ‘पुढारी’च्या (Dainik Pudhari) वतीने हृद्य सोहळ्यात सन्मान करण्यात आला. सुमारे दोन तास रंगलेल्या या देखण्या सोहळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीचे लाभलेले कोंदण हे खास वैशिष्ट्य ठरले. (Yuva Pudhari Sanman Sohala – 2024)

साडेआठ दशकांहून अधिक काळ समाजमनाशी घट्ट नाळ जुळलेल्या ‘पुढारी’ची उपक्रमशीलता प्रशंसेला पात्र असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी आपल्या भाषणात काढले. हॉटेल एसएसके सॉलिटेअर येथे आयोजित या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, दीपक बिल्डर्स अण्ड डेव्हलपर्सचे दीपक चंदे या अतिथींसह दैनिक पुढारीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे आणि युनिट हेड राजेश पाटील उपस्थित होते. (Yuva Pudhari Sanman Sohala – 2024)

Back to top button