पुढारी ऑनलाईन डेस्क : आमच्या कुणबी नोंदी सापडल्या असतील तर अंमलबजावणी का केली नाही? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी डोक्यातील हवा कमी करावी. ज्या लोकांमुळे ते इथपर्यंत गेले आहेत. त्यांच्यासाठी काय केले त्यांनी. विश्वासघात होईल असे त्यांनी वागू नये. मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्यासमोर घेतलेली शपथ अपूर्ण आहे. हे मान्य करावे. आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास होता. मराठ्यांमुळे शिंदेचे कपडे पांढरे अन्यथा त्यांचे कपडे ठिगळासारखे असते, अशी बाेचरी टीका आज (दि.२१ ) मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.
आता आंदोलन थांबणार नाही, आज (दि.२१) १२ वाजता होणाऱ्या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांना काल पश्चाताप झाला असेल. राज्यात काेणत्याही भागात जल्लोष झालेला नाही. पुन्हा आंदोलन तीव्र केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (Maratha reservation)
मराठा आरक्षण विधेयकावर बोलत असताना जरांगे-पाटील म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी तसे सांगावे. १०% आरक्षणाशी आमचा काहीही संबंध नाही आहे. आरक्षण टिकेल की नाही याच्याशीही आमचा काहीही संबध नाही, असे स्पष्ट करत आंदोलनावर ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आम्हाला ओबीसीमधून आरक्षण हवं आहे. सगेयोयऱ्यांच्या अधिसुचनेची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता मागे हटणार नाही. सरकराने अधिसुचना दिली; पण अंमलबजावणी केली आहे. मराठा आरक्षणावर सरकारने लोकांना सांगण्यासारख काय केलं आहे? असाही सवाल त्यांनी यावेळी केला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला आहे, असा आराेपही त्यांनी केला.
आमच्या नोंदी सापडल्या असतील तर अंमलबजावणी का केली नाही? असा सवाल उपस्थित करत जरांगे पाटील म्हणाले की," मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी डोक्यातील हवा कमी करावी. ज्या लोकांमुळे ते इथपर्यंत गेले आहेत. त्यांच्यासाठी काय केले त्यांनी. विश्वासघात होईल असे मुख्यमंत्र्यांनी वागू नये. मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्यासमोर घेतलेली शपथ अपूर्ण आहे. हे मान्य करावे. आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास होता. मराठ्यांमुळे शिंदेचे कपडे पांढरे अन्यथा त्यांचे कपडे ठिगळासारखे असते, अशी बाेचरी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा :