Jalgaon HSC Board Exam 2024 : उद्यापासून बारावीची परीक्षा ! | पुढारी

Jalgaon HSC Board Exam 2024 : उद्यापासून बारावीची परीक्षा !

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा उद्या बुधवार, दि. 21 पासून सुरू होत आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 48 हजार 273 परीक्षार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. इंग्रजी विषयाच्या पेपरपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. (HSC Board Exam 2024)

दहावी व बारावी हे विद्यार्थी दशकातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असून करीयरच्या दृष्टीने महत्वाचे शैक्षणिक वळण असते. या महत्त्वाच्या टप्प्यातील पहिला परीक्षा ही बारावीच्या विद्यार्थ्यांची दि. 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातून 48 हजार 273 विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत. परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी यावर्षी बोर्डाने विद्यार्थ्यांना पाणी देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा कक्षात प्रवेश बंद केले आहेत. यासाठी स्वत: विद्यार्थ्यांनी पारदर्शक अशी पाण्याची बाटली आणून परीक्षेला बसायची मुभा देण्यात आली आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी आठ भरारी पथके यावेळी नियुक्त करण्यात आलेली आहेत. बारावीचे पेपर हे दि. 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.  यामध्ये पहिला पेपर हा इंग्रजी, दि. 22 तारखेला हिंदी, दि. 23 तारखेला मराठी, दि. 24 तारखेला मराठी प्राकृत किंवा संस्कृत असे पेपर होणार असून प्रत्येक शाखेनुसार विद्यार्थ्यांचे पेपर पुढील तारखेला होणार आहेत. (HSC Board Exam 2024)

हेही वाचा : 

Back to top button