Weather Update : रात्री, पहाटे गारठा; तर दिवसा कडक उन्हाच्या झळा : नागरिक हैराण | पुढारी

Weather Update : रात्री, पहाटे गारठा; तर दिवसा कडक उन्हाच्या झळा : नागरिक हैराण

पुणे : राज्यातील किमान तापमानात घट आणि कमाल तापमानात वाढ असे विचित्र वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मंगळवारी पुणे शहरातील किमान तापमान 12.3 अंशांवर खाली आल्याने ते राज्यात नीचांकी ठरले. उत्तर भारतातील शीतलहरी व बंगालच्या उपसागरात तयार झालेला उच्च दाबाचा पट्टा यामुळे दिवसा कडक ऊन आणि रात्री व पहाटे गारठा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरावर उच्चदाबाचा पट्टा (अँटीसायक्लोन) प्रभावाखाली बाष्पयुक्त वारे वाहत आहे.

त्यामुळे देशातील काही भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट व पाऊस सुरू आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यावर होत असून किमान पहाटे व रात्रीचे किमान तापमान कमी होत आहे.

दिवसभराच्या कमाल तापमानात दुपारी वाढ होत आहे. राज्याच्या कमाल व किमान तापमानात सुमारे 22 ते 23 अंशांचा फरक निर्माण झाल्याने पहाटे व रात्री कमी तापमान तर दिवसभर उन्हाचा कडाका असेच वातावरण आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत होत आहे. सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत.

हेही वाचा

Back to top button