Weather Update : विजांच्या कडकडाटासह आजपासून पावसाची शक्यता | पुढारी

Weather Update : विजांच्या कडकडाटासह आजपासून पावसाची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात शनिवार (दि. 10) पासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र 10 ते 12 तर विदर्भात 10 ते 14 फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या स्थितीमुळे देशातील बहुतांश भागात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटात मध्यम ते हलका पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकण वगळता सर्वत्र पावसाची शक्यता

राज्यात कोकण वगळता सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात 10 ते 12 असे तीन दिवस तर विदर्भात 10 ते 14 फेब्रुवारीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस होईल. वार्‍याचा वेग वाढल्याने सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

Back to top button