Weather Update : राज्यात थंडीचा जोर ; विदर्भात पावसाचा अंदाज | पुढारी

Weather Update : राज्यात थंडीचा जोर ; विदर्भात पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात विदर्भ वगळता सर्वत्र कोरडे वातावरण असल्याने थंडीत पुन्हा वाढ होत आहे. सोमवारी जळगावचे किमान तापमान 9, नाशिक 11.6, तर पुणे शहराचे 12.1 अंश होते. दरम्यान, उत्तर भारतात 26 जानेवारीपर्यंत थंडीचा कहर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

महाराष्ट्रात विदर्भात मंगळवारी हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, उर्वरित भागातून ढगांची गर्दी कमी झाली असून, कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वातावरण कोरडे राहणार आहे. त्यामुळे या भागातील किमान तापमानात घट होत आहे. सोमवारी छत्रपती संभाजीनगर 11.5, अहमदनगर 12.4, मालेगाव 11.8, 12.4, महाबळेश्वर 13.5, कोल्हापूर 17.1, मुंबई 20.5 अंश असे किमान तापमान होते.

हेही वाचा

 

Back to top button