weather update : मध्य महाराष्ट्राला आज, उद्या पावसाचा इशारा | पुढारी

weather update : मध्य महाराष्ट्राला आज, उद्या पावसाचा इशारा

पुणे : उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवाताचा परिणाम राज्यावर दिसत असून सोमवारी व मंगळवारी मध्य महाराष्ट्राला जोरदार ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवातामुळे किमान तापमान 4 ते 8 अंशांवर आले आहे. आगामी तीन दिवस पंजाब, हरियाणा आणि राजस्थानात थंडीची लाट अतितीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसत आहे. त्यातही प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात 8 व 9 जानेवारी रोजी मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागात प्रामुख्याने सोमवार व मंगळवारी मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Back to top button