राज्यात 23 हजार 526 वनराई बंधारे तयार

राज्यात 23 हजार 526 वनराई बंधारे तयार
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कृषी आयुक्तालयाने राज्यभर लोकसहभाग आणि श्रमदानातून ओढ्या-नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी 50 हजार वनराई बंधारे बांधण्याची धडक मोहीम राबविली. त्यातून सद्य:स्थितीत 23 हजार 526 वनराई बंधारे (47.05 टक्के) बांधण्यास यश आले असून, अद्यापही ही मोहीम सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे सहसंचालक पांडुरंग शेळके यांनी दिली. राज्यात तयार झालेल्या वनराई बंधार्‍यातील साठलेल्या पाण्यामुळे सुमारे 47 हजार हेक्टरवरील रब्बी हंगामातील पिके आणि फळबागांना संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे. कृषी विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास वनराई बंधारे बांधण्यासाठीचे लक्ष्यांक देण्यात आले. त्यानुसार लोकांचा सहभाग वाढवून श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात आली.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 3 हजार 135 बंधारे तयार
राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक वनराई बंधारे तयार झाले आहेत. पुण्यास 3 हजार 400 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 8 डिसेंबरअखेर पुणे जिल्ह्यात त्यापैकी 3 हजार 135 म्हणजे उद्दिष्टांच्या 92.21 टक्क्यांइतके बंधारे पूर्ण केले आहेत, तर उद्दिष्टांच्या तुलनेत यवतमाळमध्ये 1900 (100 टक्के), नंदुरबार 1394 (99.57 टक्के), गडचिरोली 1405 (93.67 टक्के), रायगड 553 (92.17 टक्के) वनराई बंधारे तयार झाले आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news