Rain Update : कोकणसह मध्य महाराष्ट्रात आज, उद्या पावसाची शक्यता | पुढारी

Rain Update : कोकणसह मध्य महाराष्ट्रात आज, उद्या पावसाची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने कोकण व मध्य महाराष्ट्रात 30 व 31 रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातच वार्‍याचा वेग वाढल्याने दक्षिण भारतात पाऊस वाढला आहे; तर उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात निर्माण झाल्याने पूर्वोत्तर भारतात काही भागात पावसाचा अंदाज आहे. केरळ आणि कर्नाटकात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही होणार आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्राला 30 व 31 रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर मात्र परत पावसाचा जोर कमी होत आहे.

हेही वाचा :

Back to top button